शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

४९ शेतकऱ्यांना कृषिरत्न पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:53 IST

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रगतीशील ४९ शेतक-यांना २९ मार्च रोजी जि.प.च्या वतीने ‘हिंगोली कृषिरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रगतीशील ४९ शेतक-यांना २९ मार्च रोजी जि.प.च्या वतीने ‘हिंगोली कृषिरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे, आ. तान्हाजी मुटकुळे, आ.रामराव वडकुते, उपाध्यक्ष अनिल पतंगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, शिक्षण सभापती संजय देशमुख, कृषि व पशुसंवर्धन सभापती प्रल्हादराव राखोंडे, अ.मुकाअ ए. एम. देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक लोंढे, गटनेता अंकुश आहेर, मनिष आखरे, कषि विकास अधिकारी यू. ए. गर्जे आदी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव तसेच जि. प. विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दीपप्रज्वलानाने कार्यक्रमास सुरूवात झाली.ज्या शेतकºयांनी ऊस, रेशिम शेती, हळद, बटाटे यासारख्या पिकाचे विक्रमी उत्पादन घेऊन इतर शेतकºयांना शेती करण्यासंदर्भात एक मार्ग दाखविण्याचे काम केले. अशा शेतकºयांची या पुरस्कारासाठी निवड केली होती. यावेळी मान्यवरांनी प्रगतीशिल शेतकºयांनी इतरही शेतकºयांना आधुनिक शेतीचा मार्ग दाखवून मदतीचा हात देण्याचे आवाहन केले. प्रगतिशील शेतकरी तथा काकडदाभ्याचे सरपंच माणिकराव करडिले यांनी पुरस्कार नाकारला. ते म्हणाले, या पुरस्कार उपक्रमाचे स्वागत आहे. मात्र मागील तीन वर्षांत शेतीमालाला भाव नाही. शेतकºयांना अडचणीत कोणतीच मदत नाही. ही परिस्थिती सुधारेपर्यंत पुरस्कार स्वीकारणार नाही.हिंगोली : पुरस्कारप्राप्त शेतकºयांची यादीश्याामराव हनवतराव ढोबळे रा. आसोला, जगन्नाथ नारायणराव गायकवाड रा. उखळी, सुदाम माणिकराव बोंगाणे रा. उमरा, सुधाकर देवबा गिराम रा. सावळी बै., बाबाराव रामराव पडोळे रा. जडगाव, पांडुरंग कुंडलिकराव सांगळे रा. गोजेगाव, माणिकराव दुलाजी करडिले रा. काकडदाभा, कैलास माधव लेकुळे रा. जामगव्हाण, बबन ग्यानोजी कल्याणकर रा. कंजारा, बाबुराव ग्यानोजी माखणे रा. रुंज, प्रमोद तुकाराम नादरे रा. गिरगाव, सोपान रामराव शिंदे रा. पांगरा शिंदे, फालाजी पुरभाजी दासे रा. महमदपुरवाडी, सुरेश निवृत्तीराव चव्हाण रा. तुळजापूरवाडी, दुलबाराव विठ्ठलराव कदम रा. वाई गोरखनाथ, मुरलीधर साहेबराव सावंत रा. बोरी, बालाजी विश्वनाथ सोळंके रा. धानोरा, मुंजाजी गंगाधर कातोरे रा. आरळ, सुभाष तुकाराम डुकरे रा. विरेगाव, सदाशिव चन्नाआप्पा गवळी रा. कुरूंदा, देवराव मल्कार्जुन भुसे रा. कुरूंदा, श्रीपत कचरू दवणे रा. खांडेगाव, लिंबाजी बयाजी नवघरे रा. बाभुळगाव, किसनराव नामदेवराव गावंडे रा. कनेरगाव नाका, सुधाकर गणपतराव जाधव रा. माळहिवरा, नितीलेश पंडितराव काटकर रा. कनका, कैलास तुकाराम माने रा. दाटेगाव, भिकाजी ग्यानोजी जाधव रा. विडोळी, त्र्यंबकराव किसनराव तावरे रा. ब्रम्हपुरी, कृष्णाजी कुंडलिकराव कºहाळे रा. डिग्रस कºहाळे, अशोक रामराव कुरवाडे रा. कळंमकोंडा बु., विनायकराव बाबाराव बोंढारे रा. आ. बाळापूर, रामजी शामजी तोरकड रा. जांब, ज्ञानोबा पंडितराव देशमुख रा. नवखा, बाबाराव देवराव श्रृंगारे रा. रेणापूर, मुकिंदराव नारायणराव पतंगे रा. कवडी, देवराव कोंडबाराव पाटील रा. जरोडा, ज्योतीबाई गणेश कदम रा. वारंगा फाटा, संतोष फकीरराव मंदाडे रा. येहळेगाव गवळी, सुधाकर दादाराव जगताप रा. खरवड, कोंडबाराव सटवाराव बोंढारे रा. डोंगरकडा, रामराव कुंडलिकराव उन्हाळे रा. दांडेगाव, दिनकर रंगराव गडदे रा. ब्रम्हवाडी, केशव विठ्ठलराव हेंबाडे रा. वलाना, वसंत लक्ष्मण भोस रा. सिंनगी खांबा, विठ्ठल सखाराम देशमुख रा. पुसेगाव, हेमराज रतनलाल धुत रा. ताकतोडा, गजानन धोंडुजी सावसुंदर रा. केलसुला, दगडू नारायण देशमुख रा. पानकनेरगाव, रमेशराव मानकोजी कुटे रा. शिवणी बु., बबन केशवराव मगर रा. सुरजखेडा, रामकिशन नामाजी कोटकर रा. भानखेडा आदींना पुरस्काराने सन्मानित केले.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदFarmerशेतकरी