शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीची जीवनवाहिनी असलेली कयाधू नदी कचरा व सांडपाण्यामुळे बनलीय गटारगंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 11:48 IST

हिंगोली शहरानजीकच या नदीचे पात्र कचरा व गाळामुळे उथळ होत चालले आहे.

ठळक मुद्देतालुक्याचीच नव्हे, तर अर्ध्या जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या कयाधू नदी सध्या मरणयातना भोगत आहे. या नदीवर मायनर बॅरेजेस होणार असले तरीही ते होईपर्यंत असेच बेहाल राहण्याची चिन्हे आहेत.

हिंगोली : तालुक्याचीच नव्हे, तर अर्ध्या जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या कयाधू नदी सध्या मरणयातना भोगत आहे. हिंगोली शहरानजीकच या नदीचे पात्र कचरा व गाळामुळे उथळ होत चालले आहे. या नदीवर मायनर बॅरेजेस होणार असले तरीही ते होईपर्यंत असेच बेहाल राहण्याची चिन्हे आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, हिंगोली व कळमनुरी या तीन तालुक्यांतून कयाधू वाहते. या नदीच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी पावसाळ्यात आले तसे वाहून जाते. या नदीवर एक-दोन कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. मात्र डोंगरगाव पूल येथे तेवढे पाणी साठलेले दिसते. इतर बंधाºयांचा फारसा उपयोग पाणी साठविण्यास किंवा शेतीसाठीही होत नाही. हिंगोलीनजीक तर ही नदी म्हणजे कोरडे पात्रच असते. हिंगोली शहरातील सांडपाण्यामुळे मात्र जणू नाल्यासारखी ती वाहती असल्याचे चित्र दिसून येते. मात्र शहरानजीकच्या भागात या नदीचे पात्र उथळ होत चालले आहे. 

कधीकाळी या भागातून आम्ही गाढवावरून वाळू वाहतूक करायचे, असे जुने जाणकार अनेक जण  सांगतात. सध्या मात्र येथे माती व प्लास्टिकयुक्त कचरा साठल्याने पात्रात बेट तयार झाले आहेत. त्यावर हिरवळ दाटत आहे. त्यामुळे नदीला पूर आला तरीही हा गाळ वाहून जात नसल्याचे चित्र आहे. यावर काही प्रमाणात गुरांची गुजराण होत असली तरीही त्यामुळे नदी मात्र मृतप्राय झाल्यात जमा झाली आहे. आ.तान्हाजी मुटकुळे यांनी अनुशेषाचा मुद्दा निकाली लावल्यात जमा आहे. मात्र एकदा मिनी बॅरेजेस झाले तरीही हिंगोली शहरानजीकच्या घाट विकासाचा कार्यक्रमही हाती घ्यावा लागणार आहे. लोकसहभागातून तरी हा गाळ काढणे गरजेचे आहे.

शहरवासियांसह पालिकेने पुढाकार घ्यावाहिंगोलीनजीक कयाधूच्या पात्रातील गाळ काढण्याचे काम करून त्यात सांडपाणी जाणार नाही, याची काळजी घेतली जाणे गरजेचे आहे. शिवाय या नदीपात्रातील गाळ काढून घेतल्यास निदान पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात वनराई बंधा-यासारखी व्यवस्था केली तरीही चांगला पाणीसाठा होणे शक्य आहे. त्याचा शहर परिसरातील पाणीपातळीसह आजूबाजूच्या शेतक-यांनाही चांगला फायदा होऊ शकतो. तर पात्रातून दूषित पाण्याची दुर्गंधी येण्याची समस्याही दूर होणार आहे.

टॅग्स :riverनदी