शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीतून चोरी गेलेली जीप सापडली तेलगंणात

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: September 7, 2023 14:50 IST

जिल्हा परिषदेच्या मैदान परिसरातून झाली होती चोरी

हिंगोली : शिवसेनेचे (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी कार्यकर्ते घेऊन आलेली जीप चोरट्यांनी हिंगोलीतून पळवली होती. ही जीप तेलंगणात आढळून आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाकडून जीप ताब्यात घेतली.

शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची २७ ऑगस्ट रोजी हिंगोली शहरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी हिंगोलीसह नांदेड, परभणी, यवतमाळ आदी जिल्ह्यातून कार्यकर्ते आले होते. जिल्हा परिषदेच्या मैदान परिसरात वाहनतळासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. या सभेसाठी ढाणकी (ता. उमरखेड) येथील शेख अजीम शेख रहिम हे त्यांच्या मालकीच्या जीपमध्ये कार्यकर्तें घेऊन आले होते. जि.प. मैदान परिसरात त्यांनी जीप उभी करून ते सभेसाठी गेले होते. जीप जवळ कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यानी जीप चोरून नेली होती. या संदर्भात हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला होता.

दरम्यान, जीपचा शोध घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस उप निरीक्षक विक्रम विठुबोने यांच्या पथकाने तपास सुरू केला होता. ही जीप तेलंगणा राज्यात असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेलंगणा गाठत अविनाश पांडुरंग पखाले (वय २२ रा.ढाणकी ह.मु. अदिलाबाद, तेलंगणा) यास ताब्यात घेतले. त्यास विचारपूस केली असता त्याने जीपची चोरी केल्याची कबुली दिली. त्याचेकडून दीड लाख रूपये किमतीची जीप ताब्यात घेतली. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार सुनील अंभोरे, नितीन गोरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली