जयभीमच्या घोषणांनी दणाणली हिंगोली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:33 AM2018-04-15T00:33:49+5:302018-04-15T00:33:49+5:30

येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध सामाजिक कार्यक्रमांसह सायंकाळी मिरवणुकाही काढण्यात आल्या. यात आबालवृद्ध हर्षोल्हासात सहभागी झाले होते.

 Jayibhiman's declaration concludes with Hingoli | जयभीमच्या घोषणांनी दणाणली हिंगोली

जयभीमच्या घोषणांनी दणाणली हिंगोली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध सामाजिक कार्यक्रमांसह सायंकाळी मिरवणुकाही काढण्यात आल्या. यात आबालवृद्ध हर्षोल्हासात सहभागी झाले होते.
हिंगोलीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध भागात सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालयांत अभिवादनाचा कार्यक्रम झाला. अनेक बुद्धविहारात अनेक सामाजिक उपक्रमही ठेवले होते. यात त्या-त्या भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डॉ.आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने मोटारसायकल रॅलीही काढली. आ.तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, नगरसेवक गणेश बांगर, दिवाकर माने, प्रा.साकळे, मिलींद उबाळे आदींच्या उपस्थितीत ही रॅली निघाली. यात तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सायंकाळी चार वाजेच्या नंतर शहरातील विविध भागांतून डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे मिरवणुका येत होत्या. यामध्ये ढोल-ताशांच्या गजरात लेझीम पथके, सजीव देखावे सादर करण्यात आले. निळे झेंडे हाती घेऊन सहभागी झालेल्या तरुणांमुळे सगळे रस्ते या रंगात न्हाऊ न निघाल्यासारखे भासत होते. ठिकठिकाणी या मिरवणुकांसाठी पाण्याची व्यवस्था केल्याचेही पहायला मिळाले. काही ठिकाणी फराळही होता. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरूच होत्या.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी अनिल भंडारी आणि पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पुष्पहार अर्पण करत मानवंदना दिली. यावेळी पोलीस बँड पथकाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. ८ ते १५ एप्रिल कालावधीत आयोजित सामाजिक समता सप्ताहाची सांगता झाली. यावेळी जि.प.च्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, सभापती सुनंदा नाईक, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, समाजकल्याण अधिकारी छाया कुलाल, तहसीलदार गजानन शिंदे, वन अधिकारी केशव वाबळे, न.प. मुख्याधिकारी रामदास पाटील, सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, समाज कल्याण अधिकारी गीता गुट्टे, डीवायएसपी सुजाता पाटील, पोनि मारुती थोरात, डॉ. विजय निलावार, मधुकर मांजरमकर यांची उपस्थिती होती.

Web Title:  Jayibhiman's declaration concludes with Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.