शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएल मॅचवरील सट्ट्याचा डाव पोलिसांनी उधळला ;१ लाखाचा मुद्देमाल जप्त

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: April 19, 2023 18:16 IST

हिंगोली शहरातील मस्तानशहा नगरात पोलिसांची कारवाई

हिंगोली : आयपीएल मॅचवर सट्टा खेळविणाऱ्या दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई १९ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता करण्यात आली असून एकास ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १ लाख १८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हिंगोली शहरातील मस्तानशहा नगरात एका ठिकाणी आयपीएल मॅचवर चढ्या दराने भाव देवून लोकांकडून पैसे घेऊन सट्टा खेळवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली  होती. त्यावरून पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या पथकाने १८ एप्रिल रोजी रात्री ८.३० च्या सुमारास छापा टाकला. यावेळी एकजण ॲपवर लोकांना आयपीएल मॅचवर चढ्या दराने भाव देवून त्यांच्याकडून पैसे घेत सट्टा चालवित असल्याचे आढळून आले. तसेच त्याने अन्य एकास सट्टा देत असल्याचे सांगितले.

पोलिसांनी त्याचेकडून रोख ८ हजार २०० रूपये, ४ मोबाईल, एक दुचाकी असा एकूण १ लाख १८ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने यांच्या फिर्यादीवरून उददेश धर्मेंद्र जैस्वाल (रा. प्रविणनगर, हिंगोली) व मिस्किन नावाच्या त्याच्या साथीदाविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार नितीन गोरे, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले यांच्या पथकाने केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी