शहरातील नारायणनगर रोड, देवडानगर, नाईकनगर, तसेच इतर नगरामध्ये न. प. पथकाने व्यापाऱ्यांच्या दुकानांना भेटी देऊन कोरोना तपासणी करण्याचे आवाहन केले. जे व्यापारी कोरोना चाचणी करणार नाहीत त्यांना दुकाने उघडता येणार नाहीत. तसेच कोरोना चाचणी केली नाही तर जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले असे समजून त्यांंना दंड लावून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर यांनी सांगितले.
३५ नागरिकांना लावला दंड
२५ मार्च रोजी मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत शहरातील अग्रसेन चौक, इंदिरा चौक, गांधी चौक, जवाहररोड, पाण्याची टाकी, देवडानगर, नाईक नगर, आदी भागात विनामास्क फिरणाऱ्या ३५ नागरिकांना २०० रुपयांप्रमाणे दंड ठोठावला. त्यांच्याकडून दंड स्वरुपात सात हजार रुपये वसूल करण्यात आले. पथकामध्ये स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, बी. के. राठोड, पंडित मस्के, प्रवीण चव्हाण, नागेश नरवाडे, पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन विना मास्क फिरू नका, अशा सूचनाही देण्यात आल्या.