मानसिक ताण वाढला; जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:29 AM2021-05-10T04:29:26+5:302021-05-10T04:29:26+5:30

हिंगोली : कोरोना महामारीमुळे ‘मानसिक’ ताण वाढला आहे, आता जगायचे कसे? असा प्रश्न विचारताना अनेक जण पाहायला मिळत आहेत. ...

Increased mental stress; How to live | मानसिक ताण वाढला; जगायचे कसे?

मानसिक ताण वाढला; जगायचे कसे?

Next

हिंगोली : कोरोना महामारीमुळे ‘मानसिक’ ताण वाढला आहे, आता जगायचे कसे? असा प्रश्न विचारताना अनेक जण पाहायला मिळत आहेत. अशा मानसिक समस्यांना वेळीच गरज भासल्यास समुपदेशनाची आवश्यकता असते व वेळ पडल्यास औषधोपचार करण्याचीही गरज असते, असे मानसोपचारतज्ज्ञांचे मत आहे.

ज्या व्यक्तींना चिंता, ताणतणाव, नैराश्य यासारखे प्रश्न भेडसावतात, अशा व्यक्तींनी वेळीच मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे योग्य ठरते. कोरोना महामारीमुळे दुर्दैवाने काही लोकांचे काम हिरावले आहे. काहींचा व्यवसाय अडचणीत आला आहे, काहींची नोकरीही गेली आहे. त्यामुळे त्या व्यक्तींना नैराश्य येणे साहजिकच आहे. तेव्हा या संकटाला घाबरून जाऊ नये. धीर न सोडता सामोरे जाणे हे अगत्याचे आहे. वेळ पडल्यास ज्या व्यक्तींना मानसिक ताणतणाव किंवा चिंता अशी लक्षणे वाटत असल्यास त्यांनी वेळीच शहरातील समुपदेशन केंद्राची मदतही घेतल्यास ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

तरुणांनी घाबरून जाऊ नये...

तरुण मंडळींनी कोरोना संकटाला न घाबरता त्याचा धैर्याने मुकाबला करणे आवश्यक आहे. शासनाने ठरवून दिलेले नियम काटेकोरपणे पाळल्यास कोरोना नियंत्रणात येऊन आपले जीवन पूर्ववत होईल. यासाठी धीटपणाने अशा व्यक्तींनी कोरोनाला सामोरे जावे.

मनोरंजनाची साधने वापरणे....

लॉकडाऊनमध्ये हाताला काम राहिले नाही. कोरोना महामारीमुळे सद्य:स्थितीत घराबाहेर पडणे शक्य नाही. अशावेळी मनोरंजनाची साधने वापरणे व सतत कामात व्यस्त राहणे हे उपयुक्त ठरेल.

तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा...

पुरुष किंवा महिला ज्या कोणाला ताणतणावाची लक्षणे दिसून येत असतील तर त्यांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे हेच उपयुक्त ठरेल.

समुपदेशन फायद्याचेच...

समुपदेशन केंद्रामध्ये तणावग्रस्त व्यक्तींच्या समस्यांचे निराकरण केले जाते. एखादी व्यक्ती ताणतणावात असेल तर अशा व्यक्तीला औषधोपचार दिला जातो.

नोकरी गेली, व्यापार बुडाला, कामधंदा हातून गेला आहे, मी आता जगू शकत नाही आदी समस्या भेडसावू शकतात. अशा समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न मानसोपचारतज्ज्ञ मंडळी करतात, तसेच त्यांना योग्य दिशाही दाखविण्याचे कामही करती असतात.

डॉ. राहुल डोंगरे, मानसोपचारतज्ज्ञ, हिंगोली.

Web Title: Increased mental stress; How to live

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.