शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

वसमतमध्ये भूगर्भातून आवाज येऊन पुन्हा जमीन हादरली; सततच्या हादऱ्याने नागरिकांत घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 12:18 IST

हा प्रकार आता नेहमीच होत असल्याने जिल्हा प्रशासनाने या भागात पाहणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वसमत: तालुक्यात भूगर्भातून आवाज येत जमीन हादरण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आज, गुरुवारी सकाळी ६:५१ मिनिटाला पुन्हा भूगर्भातून आवाज येवून सौम्य धक्का बसल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. परंतु भूकंपमापक यंत्रावर याची कुठलीही नोंद झाली नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान, या महिन्यात परिसराला हादरा बसण्याची ही दुसरी वेळ आहे. भूगर्भातून आवाज येत जमीन हादरण्याचा प्रकार आता नेहमीच होत असल्याने जिल्हा प्रशासनाने या भागात पाहणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे, आंबा, बहिरोबा चौडी, डोणवाडा, पिंप्राळा, वर्ताळा, सेलू, सुकळी, कुरुंदा यासह तालुक्यातील अनेक गावांना नेहमीच भूकंपाचे धक्के बसत आहेत. भूगर्भातून आवाज येत जमीन केंव्हांही हादरत आहे. आज सकाळी ६.५१ वा दरम्यानाही असाच धक्का जाणवला. या महिन्यातील पहिल्या आठवड्यात ही जमीन हादरली होती. गत सहा ते सात वर्षापासून अनेक वेळा असे धक्के बसले आहेत. तालुक्यातील पांग्रा शिंदे भूकंपाचे केंद्र असल्याचे बोलल्या जात होते. याठिकाणी गत चार ते पाच वर्षांपूर्वी भूतज्ञांनी भेट देऊन पाहणी करून मातीचे नमुने घेतले होते. त्यानंतर पुन्हा कोणीही भेट दिली नाही. मात्र, हादरे बसण्याच्या संख्या वाढत असल्याने नागरीकांत भिती वाढली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीEarthquakeभूकंप