शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रास्तारोको आंदोलनात ‘एक मराठा लाख मराठा’ घोषणेने नर्सीफाटा दणाणला

By रमेश वाबळे | Updated: September 9, 2023 17:44 IST

मराठा समाजाला आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन

बापूराव इंगोलेनर्सी नामदेव (जि.हिंगोली) : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील हिंगोली ते सेनगाव रोडवरील बसस्थानक येथे सकल मराठा समाजबांधवांनी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी रास्ता रोको केला. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीमार व गोळीबाराच्या निषेधार्थ ९ रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील घटनेच्या निषेधार्थ शनिवारी नर्सी (नामदेव) येथील मुख्य रस्त्यावर ठिय्या मांडून दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नर्सी, पहेनी, वैजापूर, केसापूर, कडती, हनवतखेडा, सरकळी, काळकोंडी, जवळा (बु), आमला, नांदुरा, गिलोरी, हळदवाडी व परिसरातील मराठा समाजबांधव आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी ‘एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे’ आदींसह इतरही विविध घोषणा मराठा बांधवांनी देऊन सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला.तसेच मराठा समाजाला ओबीसी संवर्गातून तत्काळ आरक्षण देण्यात यावे, अंतरवाली सराटी येथील घटनेची चौकशी करून जखमींना तातडीने आर्थिक मदत द्यावी, जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांना निलंबित करून योग्य ती कारवाई करावी. राज्याचे गृहमंत्री यांचा राजीनामा घ्यावा, आदी मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार मुकूल पोळेकर यांच्याकडे देण्यात आले.

नर्सी ठाण्याच्या वतीने पोलिस बंदोबस्त...येथील मुख्य रस्त्यावर शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी नर्सी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अरुण नागरे, जमादार पांडुरंग डवले, शैलेश मुदिराज, शैलेश चौधरी, गजभार व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता. यावेळी काहीवेळ रस्त्यावर दुतर्फा वाहनांची रांग लागली होती.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणHingoliहिंगोली