शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत दहावीच्या ३१४ विद्यार्थ्यांची इंग्रजीच्या पेपरला दांडी, ५ कॉपीबहाद्दर पकडले

By रमेश वाबळे | Updated: March 7, 2024 19:42 IST

परीक्षेत काॅपीला आळा बसावा, यासाठी विभागीय मंडळाच्या वतीने जिल्ह्यात पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हिंगोली : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात येत आहे. ७ मार्च रोजी दहावीचा इंग्रजीचा पेपर झाला. यात भरारी पथकाच्या तपासणीत पाच काॅपीबहाद्दर आढळून आले, तर तब्बल ३१४ विद्यार्थ्यांनी या पेपरला दांडी मारली.

शिक्षण विभागाच्या वतीने दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये ५४ परीक्षा केंद्रांची स्थापना केली आहे. या परीक्षा केंद्रांवर १ मार्चपासून दहावीची परीक्षा घेण्यात येत आहे. ७ मार्च रोजी इंग्रजीचा पेपर सकाळच्या सत्रात घेण्यात आला. यामध्ये १६ हजार ११४ विद्यार्थ्यांपैकी १५ हजार ८०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर ३१४ विद्यार्थी गैरहजर राहिले. परीक्षेदरम्यान भरारी पथकाने केंद्रांना भेटी देऊन तपासणी केली. यात पाच विद्यार्थी गैरप्रकार करत असताना आढळून आले. भरारी पथकाने त्यांच्यावर कारवाई केली. परीक्षेत काॅपीला आळा बसावा, यासाठी विभागीय मंडळाच्या वतीने जिल्ह्यात पाच भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रांवर बैठे पथक, पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका ने - आण करणाऱ्या सहायक परिरक्षकांसोबत पोलिस कर्मचारी ठेवण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.

२७५ विद्यार्थ्यांनी दिला वस्त्रशास्त्राचा पेपर...शिक्षण विभागाच्या वतीने २१ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील ३७ केंद्रांवर इयत्ता १२वीची परीक्षा घेण्यात येत आहे. ७ मार्च रोजी वस्त्रशास्त्र विषयाचा पेपर घेण्यात आला. या परीक्षेला २८७ पैकी २७५ विद्यार्थी उपस्थित होते, तर १२ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण ९५.८२ टक्के एवढे राहिले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीssc examदहावी