शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दखल घेतली नाही तर मुंबईत येऊन रस्त्यावर सगळे अवयव विकू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 06:56 IST

कर्ज परतफेडीसाठी हिंगोलीच्या कर्जबाजारी शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; ही तर शरमेची बाब : विरोधकांची सरकारवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्क  गोरेगाव (जि. हिंगोली) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेतली नाही तर थेट मुंबई गाठून आमची किडनी, लिव्हर, डोळे आदी विविध अवयव विकू. त्यातून मिळालेल्या पैशातून आम्ही बँकेचे कर्ज फेडू, असा निर्वाणीचा इशारा हिंगोलीतील काही कर्जबाजारी  शेतकऱ्यांनी सरकारला दिला आहे.  

यंदा खरीप हंगामात पावसाच्या खंडामुळे शेती पिकली नाही. हाती आलेल्या तोडक्या शेतमालाला भावही मिळत नाही. पीकविमा किंवा कुठले शासकीय अनुदानही मिळाले नाही. या अनेक संकटांमुळे शेतकरी सध्या आर्यिक संकटात सापडल्याचे चित्र सध्या आहे. 

nकौटुंबिक उदरनिर्वाह भागविण्यासह सात-बारा उताऱ्यावर असलेले बँकेचे कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. 

n हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी अवयव विक्रीचा निर्णय घेत तसे निवेदनच बुधवारी मुख्यमंत्र्यांकडे पाठविले आहे.

‘मरता और क्या नही करता...’पीकविम्यापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे, शेतमालाला योग्य भावही मिळत नाही. सततची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून शेतकरी आत्महत्येच्या घटना घडत आहेत.तरीही शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल शासनाला थोडेही गांभीर्य नाही. बँक कर्जापाेटी मरणाची वेळ आली असताना आत्महत्या करून बदनामीचे मरण पत्करण्यापेक्षा अवयव विक्रीतून कर्जाची परतफेड करून मरण पत्करू, असे  शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. 

हे महाराष्ट्राचे दुर्दैव, दुर्लक्ष नको : वडेट्टीवार nमुंबई : हिंगोलीतील शेतकऱ्यांनी कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवल्याची बातमी ‘लोकमत’ने गुरुवारी प्रकाशित केली. त्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केले आहे.nलाखभर रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांवर अवयव विकण्याची वेळ यावी, हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.nशेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे पण सरकार दुर्लक्ष करत आहे असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीMumbaiमुंबईHingoliहिंगोली