शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

संतोष बांगर यांचा लागणार कस, कळमनुरी मतदारसंघात यंदा चौरंगी लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 14:42 IST

सर्वच उमेदवारांचा बैठकांवर भर, कार्यकर्तेही चौफेर सक्रिय

- इलियास शेखकळमनुरी : ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेतल्यानंतर मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले असून, मतदारसंघात चौरंगी लढत होईल असेच दिसते. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे डॉ. संतोष टार्फे, महायुतीकडून संतोष बांगर, वंचितकडून डॉ. दिलीप मस्के आणि अपक्ष अजित मगर निवडणूक रिंगणात उभे आहेत. कळमनुरी मतदारसंघात सुरुवातीला वाटले होते की, तिरंगी लढत होईल. परंतु अजित मगर यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवल्यामुळे निवडणूक चौरंगी होईल, हे निश्चित झाले आहे.

गतवेळेस एकगठ्ठा मते काही प्रमुख पक्षांनाच मिळाली होती. परंतु, यावेळेस काही पक्षांचे विभाजन झाल्यामुळे मतांचे विभाजनही होऊन बसले आहे. त्यामुळे या निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता अधिक आहे. मतदानाला अजून दहा दिवस बाकी आहेत. त्यामुळे सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार चुरशीने प्रचार करू लागले आहेत. एवढे असताना अजूनही एकाही नेत्याची सभा झाली नाही. जर मोठ्या नेत्यांची सभा झाली तर चित्र काहीअंशी पालटू शकते, असेही जाणकारांचे म्हणणे आहे.

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात एकूण १९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, यात १० अपक्षांचा समावेश आहे. मतदारसंघात चौरंगी लढत होत असली तरी यात अपक्षांना डावलून चालणार नाही. दुसरीकडे, प्रत्येक उमेदवार आपणच निवडून येतो, असे सांगत आहे. दुसरे म्हणजे, समर्थकांनाही आपला उमेदवार निवडून येईल, असा विश्वास आहे. निवडणुकीत स्पर्धक तेच असून, या निवडणुकीत झेंडे बदलले गेले आहेत. दोन दिवसांपासून ग्रामीण भागात कोणी मोबाइलवर प्रचार करत आहे तर कोणी प्रत्यक्ष मतदारसंघात जाऊन भेटून ‘मी निवडणुकीत उभा आहे, लक्ष असू द्या’, असे सांगू लागला आहे. निवडणुकीत उमेदवारांची संख्या १९ झाली असल्यामुळे मत विभाजनाचा फटका सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना बसण्याची शक्यता आहे.

उमेदवारांच्या हालचालीवर अधिकाऱ्यांचे लक्षनिवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक अधिकारी उमेदवारांच्या प्रत्यक्ष हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. उमेदवार कुठे सभा घेतात, कोणाला भेटतात, किती खर्च करतात, कुठे कुठे जाऊन प्रचार करतात या सर्व बारकाईवर निवडणूक विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे उमेदवारही आचारसंहितेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करू लागले आहेत. आता खर्च केला तर पुढे चालून सर्व खर्चाचा हिशेब द्यावा लागेल, जर खर्च हिशेबशीर दिला नाही तर नियमांनुसार कार्यवाही होईल, या भीतीने सर्वच उमेदवार मतदारांना प्रत्यक्ष भेटून प्रचार करू लागले आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकkalamnuri-acकळमनुरीsantosh bangarसंतोष बांगर