शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पळशी येथे घरफोडी करणारा चोरटा जेरबंद; दोघांच्या मागावर पोलिस

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: January 23, 2024 18:56 IST

घराच्या मागील चॅनल गेटचे लॉक व घराच्या दरवाजाचा कोंडा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला होता.

हिंगोली : वसमत तालुक्यातील पळशी येथे घरफोडी करून २ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दापाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. यात एकास ताब्यात घेतले असून दोघांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी रोख ६० हजार रूपये, एक कार, दोन लोखंडी रॉड जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील पळशी येथे १८ जानेवारी रोजी रात्री सोपान बेंडे यांच्या घराच्या मागील चॅनल गेटचे लॉक व घराच्या दरवाजाचा कोंडा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर कपाटातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ९५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या. सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून तपासाची चक्रे गतीमान केली. यावेळी या घटनेतील एक चोरटा गावातीलच असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने पळशी येथील सचिन मोहन शिंदे यास ताब्यात घेतले. त्यास विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. तसेच यात वसमत तालुक्यातील दोघे साथीदार असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याचेकडून त्याचे हिश्याला आलेले नगदी ६० हजार रूपये, एक कार व दोन लोखंडी रॉड असा मुद्देमाल जप्त केला. 

अन्य दोन चोरट्यांचा शोध सुरूस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सचिन मोहन शिंदे यास हट्टा पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच त्याच्या दोन साथीदाराचा शोध सुरू केला. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू, पोलिस अंमलदार गजानन पोकळे, शेख बाबर, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, विठ्ठल कोळेकर, तुषार ठाकरे, दिपक पाटील यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली