शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

वळण रस्त्यावर भरधाव कार झाडावर आदळून भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

By रमेश वाबळे | Updated: May 4, 2024 13:05 IST

उमरखेड तालुक्यातील खरुज येथील पाच जण कारने छत्रपती संभाजीनगर येथून परत गावाकडे येत असताना झाला अपघात

- बापूराव इंगोलेनर्सी नामदेव (जि. हिंगोली): भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात एक महिला व एक पुरूष असे दोघेजण जागीच ठार झाले.तर नांदेड येथे हलविल्यानंतर एकाचा मृत्यू झाला असून अन्य दोघे जखमी झाल्याची घटना सेनगाव ते नर्सी नामदेव मार्गावरील गिलोरी पाटीजवळ ४ मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली. यातील जखमींना नांदेड येथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरखेड तालुक्यातील खरुज येथील पाच जण कारने छत्रपती संभाजीनगर येथून परत गावाकडे येत असताना त्यांची भरधाव कार शनिवारी पहाटेच्या सुमारास सेनगाव ते नर्सी ना. मार्गावरील गिलोरी पाटी जवळील वळण रस्त्यावर आली असता चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या खाली असलेल्या एका झाडावर आदळली. या घटनेची माहिती मिळतात नर्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र यावेळी अपघातात कारमधील अनिरुद्ध तानाजी वानखेडे (वय २८) व अर्चना सुभाष वानखेडे (वय ३७ दोघे रा. खरूस, ता. उमरखेड) यांचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले.

तर संतोष वानखेडे, सुभाष वानखेडे व अन्य एकजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी नर्सी ना. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले आहे. यातील संतोष वानखेडे यांचाही नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी नर्सी ना.पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोली