कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आ. संतोष बांगर तर स्वागताध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीपराव चव्हाण उपस्थित होते. अध्यक्षस्थानी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याधिकारी अजय कुरवाडे, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे, पं.स. सभापती संजीवनीताई दिपके, सेवानिवृत्त न्यायाधीश पी.ए. खिल्लरे, जिजाऊ ब्रिगेडच्या वंदनाताई आखरे, नगरसेवक सुभाषराव बांगर, राम कदम, शिवसेना शहर प्रमुख अशोक नाईक, हाजी शे. नेहाल भैय्या, आनंदराव खंदारे, माजी नगरसेवक शे.शकील, प्रमेकुमार सोनुने, कॉ. बाबूराव गाडे, भागवत डोंगरे, संजय जामठीकर आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १०१ मान्यवरांचा ग्रंथ व लेखणी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन रणरागिनी राजमाता महिला मंडळाच्या अध्यक्षा द्रोपदाताई शिखरे यांनी केले होते. प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष बबनराव शिखरे यांनी केले.
ग्रंथ व लेखणी देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:34 IST