शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पवित्र ‘रमजान’निमित्त गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 23:49 IST

पवित्र रमजान महिन्यात ईदनिमित्त विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. यामुळे बाजारपेठ गजबजलेली दिसत असून कपड्यांसह विविध प्रकारच्या साहित्याची दुकाने थाटल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पवित्र रमजान महिन्यात ईदनिमित्त विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. यामुळे बाजारपेठ गजबजलेली दिसत असून कपड्यांसह विविध प्रकारच्या साहित्याची दुकाने थाटल्याचे चित्र आहे.हिंगोली येथील हरणचौक येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही ईद साजरी करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदसाठी मुस्लीम समाज बांधवांची बाजारात झुंबड उडाल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. रमजानच्या पवित्र महिन्यात ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विशेष म्हणजे शिरखुर्मा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी दुकानांवर गर्दी पाहावयास मिळाली. शीरखुर्म्यासाठी लागणारे साहित्य यामध्ये काजू, बदाम, शेवया, फेणी, चारोळी, खारीक, खोबऱ्याची मागणी जास्त असल्याचे विक्रेते शेख बाबा तांबोली यांनी सांगितले. गतवर्षी पेक्षा खोबºयाचे दर यावर्षी वाढल्याचे तांबोळी यांनी सांगितले. हैदराबाद, नांदेड, अकोला येथील ठोक बाजारपेठेतून या मालाची खरेदी केली जाते. लहान मुलांसह मोठ्या मंडळीपर्यंत सणानिमित्त लागणाºया वस्तूंची दुकाने थाटली आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व साहित्य मिळत आहे. शिवाय बांगड्या खरेदीसाठी दुकानांत शहरासह ग्रामीण भागातील महिलांची गर्दी होत असल्याचे विक्रेते सय्यद जमील हाश्मी यांनी सांगितले. तसेच महिलांसाठी गळ्यातील आकर्षक दागिने, कानातील विविध प्रकारची फुले, नेलपेंट, मेंदीचे कोन असे स्टॉलही बाजारात थाटले होते.ईदच्या शुभपर्वाला गरीब, अनाथ मुस्लिम बांधव आनंदापासून वंचित राहू नयेत, म्हणून सर्व समाजबांधव मिळून अशा कुटुंबियांना अन्नदान, कपडे तसेच विविध आवश्यक वस्तूंचे दान केले जाते. अशा प्रकारे पवित्र रमजान महिन्यात एकोप्याने आनंद साजरा केला जातो, असे शेख अन्वर तांबोली यांनीसांगितले. तसेच रमजान महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत विविध वस्तू व शीरखुर्म्यासाठी लागाणारे साहित्य खरेदीसाठी एकच गर्दी होते. रमजान महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसांत खरेदी करणाºयांची मोठी गर्दी असते.रमजान महिन्यात ‘रोजा’ म्हणजेच उपवास पकडले जातात. हे उपवास पाणी न पिता धरले जातात. रमजान महिन्याच्या सुरुवातीपासून म्हणजेच तीस दिवसांचे हे उपवास असतात.विविध प्रकारची सुगंधी अत्तरे बाजारात दाखल४रमजान ईद सणासाठी लागणारे विवध प्रकारची सुगंधी अत्तरे बाजारात विक्रीसाठी आली आहेत. मोगरा, रॉयल प्रोफेसी, अलीशा, आईसबर्ग या अत्तरांना जास्त मागणी असल्याचे विक्रेते अब्दूल माजिद रजवी यांनी सांगितले. ३ मिली असलेल्या अत्तराची किंमत ५० रूपये तर ८ मिली अत्तराची २५० ते त्यापुढे किंमत आहे. रमजान महिन्यात अत्तराला मोठी मागणी असते, असे रजवी म्हणाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक