शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

हिंगोलीकरांनी एकता दौडमधून दिला सामाजिक शांततेचा संदेश

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: August 25, 2023 17:22 IST

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

हिंगोली : सामाजिक शांतता,सद्भावनेचा संदेश देण्यासाठी व खेळाप्रती समाजात आवड निर्माण व्हावी या उद्देशाने २५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता ५ कि.मी. एकता दौड स्पर्धा घेण्यात आली. यात अधिकारी, कर्मचारी, खेळाडू, व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.  

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते एकता दौडला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. या वेळी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील,मुख्याधिकारी अरविंद मुंढे, प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, डॉ. मंगेश टेहरे, डॉ.श्रीकांत पाटील, प्रभारी पोलिस उपअधीक्षक सोनाजी आम्ले, स्थागुशा पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, विकास पाटील, शेख आदींची उपस्थिती होती. संत नामदेव पोलिस कवायत मैदान ते इंदिरा गांधी चौक- अग्रसेन चौक- जिल्हा परिषद नवीन रोड- पाण्याची टाकी -शिवाजीनगर चौक- छत्रपती शिवाजी महाराज  पुतळा चौक- पोस्ट ऑफिस चौक- जवाहर रोड - महात्मा गांधी पुतळा चौक मार्गे इंदिरा गांधी पुतळा चौक मार्गे परेड ग्राउंड येथे एकता दौडचा समारोप झाला. एकता दौडमध्ये सर्वसामान्य नागरिक, खेळाडू, पोलिस अधिकारी, अंमलदार,सर्व प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी,पोलिस भरती प्रशिक्षण अकॅडमीचे प्रशिक्षणार्थी, डॉक्टर आदींनी सहभाग नोंदविला.

शिवसांब घेवारे, अतिश चव्हाण, काजल राठोड, योगेश होडगीर ठरले विजेतेया एकता दौड स्पर्धेत खुल्या गटातून अतिश चव्हाण (प्रथम), ओमकार जगताप(द्वितीय), महिला गटातून काजल राठोड (प्रथम) , अंकिता गव्हाणे (द्वितीय) ,पोलिस अंमलदार गटातून पोलिस शिपाई योगेश होडगीर(प्रथम), पोलिस अधिकारी गटातून स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक  शिवसांब घेवारे (प्रथम) विजेते ठरले आहेत. विजेत्या स्पर्धेकांना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliceपोलिस