शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

तीन जिल्ह्यांना हादरवणाऱ्या भूकंपाचे केंद्र हिंगोलीत, ४.५ रिश्टर स्केलची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 07:52 IST

वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती

- इस्माईल जाहगीरदार.वसमत (जि. हिंगोली): आज सकाळी हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील काही भागांना सकाळी ६ वाजून ८ मिनिट ते ६  वाजून २४ मिनिटाच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती आहे.

हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला संपर्क केला असता त्यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच तालुका प्रशासनाने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे. वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे भूकंपाचे केंद्र असल्याचे बोलले जात आहे. भुकंपाचे दोन धक्के बसत आज सकाळी जमीन हादरली. गत तीन वर्षांत अनेक वेळा भूकंपाचे धक्के या भागात जाणवले आहेत. पण हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. 

हादरे बसले त्यावेळी पक्षांनी किलबिलाट करणे सुरू केले. तर गोठ्यातील जनावरांनी हंबरडा फोडला. जमीन हादरताच नागरीक घराबाहेर पडणे सुरू केल.६:८ वाजेनंतर दुसरा सदरा ६:१९ वाजेदरम्यान बसला.

जिल्हा हादरला...हिंगोली शहरासह जिल्ह्यातील कळमनुरी, औंढा, वसमत, दांडेगाव, पांगरा शिंदे, वारंगा, कुरूंदा, नर्सी, कवठा व इतर अनेक भागांमध्ये भूकंपाचे दोन हदरे लागोपाठ जाणवले.वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे,वापटी, परीसर भुकंपाचा केंद्र बिंदू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.सहा वर्षांपासून धक्का...गत पाच ते सहा वर्षा पासुन भुकंपाचे धक्के बसत आहेत. २१ मार्च रोजी सकाळी ६.८ मि ला भुगर्भातुन जोराचा आवाज येत जमीन हादरली. आता पर्यंतचा हा सर्वात मोठा भुकंपाचा धक्का बसला आहे. हिंगोली जिल्ह्यासह  नांदेड व परभणी या जिल्ह्यातील अनेक गावांना पण गुरुवार झालेल्या भुकंपाचे हादरे जाणवले.

वसमत शहरास प्रथमच तिव्र धक्का....तालुक्यातील पांग्रा शिंदे व परीसरातील गावांना मोठा तिव्र धक्का जाणवला वसमत शहरातील नागरीक घरा बाहेर पडले होते,शहर वासीयांनी प्रथमच येवडा मोठा धक्का बसला आसल्याची प्रतिक्रिया दिली, यापुर्वी सौम्य धक्के जाणवत होते.परंतु गुरुवार रोजी सकाळी बसलेला भुकंपाचा धक्का भयभीत करणारा आहे. 

नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी..गुरुवारी सकाळी भूकंपाचे दोन हजारे बसले तालुका प्रशासन नागरिकांची काळजी घेत आहे अशावेळी नागरिकांनीही घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान तहसीलदार शारदा दळवी यांनी केले आहे.

टॅग्स :EarthquakeभूकंपHingoliहिंगोली