शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली पोलीस दलातील ६३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:07 IST

विहित कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या मे महिन्यात केल्या जातात. हिंगोली पोलीस दलातील एकूण ६३ जणांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी २८ मे रोजी काढले आहेत.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांनी काढले आदेश

हिंगोली : विहित कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या मे महिन्यात केल्या जातात. हिंगोली पोलीस दलातील एकूण ६३ जणांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी २८ मे रोजी काढले आहेत. यामध्ये सपोउपनि, पोहेकॉ, पोना व पोशि आदींचा समावेश आहे. येत्या काही दिवसांतच पोलीस अधिका-यांच्याही बदल्या होणार आहेत.मे महिना सुरू होताच अधिकारी व कर्मचाºयांना बदलीची चिंता असते. जून महिन्यात शाळा सुरू होतात, त्यापुर्वी बदली कुठे झाली हे समजण्यास त्यांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून बदल्यांची प्रक्रिया पार पाडली जाते. बदलीमुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी मोक्याच्या किंवा जवळील पोलीस ठाणे मिळविण्यासाठी सर्वच कर्मचारी प्रयत्न करतात.महाराष्टÑ पोलीस सुधारणा अध्यादेश २०१५ मधील तरतुदीनुसार व जिल्हा पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान केलेल्या अधिकारास अनुसरून विहित कालावधी पूर्ण झालेल्या या घटकातील पोलीस कर्मचाºयांना त्यांच्या पसंती, नियम व प्रशासकीय निकड याचा विचार करून जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेने त्वरित प्रभावाने बदली नेमणूक करण्यात आली आहे. बदली आदेशानंतर जे पोलीस कर्मचारी रुग्ण निवेदन करतील अथवा गैरहजर राहतील त्यांना रुग्ण निवेदनाच्या तारखेपासून स्थित कार्यमुक्त करण्यात येणार आहे. तसेच त्यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश त्यांच्या निवासस्थानी बजावण्यात येईल. बदली आदेशात नेमणूक केलेल्या ठिकाणात अंशत: बदल करणे, बदली रद्द करणे, बदलीस स्थगिती देणे अशा प्रकारच्या विनंत्यांची या कार्यालयातर्फे दखल घेतली जाणार नाही. बदली झालेले पोलीस कर्मचारी बदली आदेशाचे पालन करून नवीन नेमणूक दिलेल्या ठिकाणी प्रथम हजर होतील व तेथील प्रभारी अधिकारी यांच्यामार्फत त्यांची विनंती नव्याने या कार्यालयास सादर करतील. नवीन प्रभारी अधिकारी यांच्या शिफारशीशिवाय विनंतीचा विचार केला जाणार नाही.हिंगोली ग्रामीण ठाण्यातील सपोउपनि गणेश भोजाजी शिंदे यांची नर्सी नामदेव पोलीस ठाणे येथे बदली झाली आहे. तर सपोउपनि किशन राजाराम डुकरे यांची सेनगाव ठाण्यातून हिंगोली ग्रामीण येथे तर सपोउपनि पुंजाजी आश्रुबा घोगरे यांची हिंगोली पोलीस मुख्यालयातून सेनगाव येथे बदली झाली आहे.पोलीस ठाणे कर्मचा-यांना लेखी सूचनाबदली झालेले पोलीस कर्मचारी बदली ठिकाणी हजर न झाल्यास त्यांच्या बदली आदेशात नेमणूक केलेल्या ठिकाणात अंशत: बदल करणे, बदली रद्द करणे, बदलीस स्थगिती देणे अशा विनंतीचा विचार केला जाणार नाही. या संबंधीत पोलीस कर्मचा-यांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत.पोलीस स्टेशन शाखा प्रभारी अधिका-यांनी त्यांच्या पोस्टेस, शाखेस हजर झालेल्या पोलीस कर्मचारी यांची नावे व त्यांच्या पोस्टे शाखेतून बदली ठिकाणी कार्यमुक्त केलेल्या पोलीस कर्मचाºयांची नावे हजर झालेल्या कार्यमुक्त केलेल्या दिनांकासह पोलीस अधीक्षक कार्यालयास कळवावी लागणार आहेत.बदली आदेशात नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचा-यांना नवीन बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यापुर्वी त्यांनी त्यांच्याकडील तपासावरील प्रलंबित सर्व गुन्हे, वरिष्ठ अर्ज, स्थानिक अर्ज आणि इतर सर्व प्रलंबित प्रकरणे प्रभारी अधिकाºयांनी स्वत:कडे घेऊनच कार्यमुक्त करावे, अन्यथा सर्वस्वी जबाबदारी ठाणे प्रभारी अधिकाºयांची राहणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli S Pपोलीस अधीक्षक, हिंगोलीHingoli policeहिंगोली पोलीसTransferबदली