वसमत (जि. हिंगोली) : हट्टाकडून जवळा बाजारकडे जाणारी जीप आणि हट्ट्याकडून येणाऱ्या एसटी बसचा आडगाव (रंजे) जवळ अपघात झाला. या अपघातात कारमधील एक जण जागीच ठार झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना सोमवारच्या मध्यरात्री घडली.
वसमत तालुक्यातील हट्टा ते जवळाबाजार मार्गावर १७ मार्च रोजी मध्यरात्री २ वाजेदरम्यान हट्टाकडून जवळाबाजारकडे जाणारी जीप व जवळा बाजारकडून हट्टा गावाकडे येणाऱ्या एसटी बसचा जोराचा अपघात झाला. या अपघातात कार क्र एम एच ०६ ऐझेड ५७२१ मधील संग्राम नामदेव सुरनर (रा पालम जि परभणी)यांचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले.
सदर घटनेची माहिती हट्टा पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.यानंतर वेळीच जखमींना पोलिसांनी परभणी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आसल्याची माहीती पोलीसांनी दिली. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.