- इस्माईल जहागीरदार
वसमत (हिंगोली): वसमत शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या प्राचीन तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना गुरुवारी एक विस्मयकारक घटना समोर आली आहे. तलावाच्या संरक्षण भिंतीसाठी खोदकाम सुरू असताना अचानक एक प्राचीन भुयारी मार्ग आढळून आला असून, या घटनेमुळे शहरात कुतूहल आणि चर्चेला उधाण आले आहे.
दुरुस्तीच्या कामात इतिहासाचा पाझरतीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे वसमतचा हा ऐतिहासिक तलाव फुटला होता. आमदार राजू नवघरे यांच्या पाठपुराव्यातून सध्या या तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. गुरुवारी जेसीबीच्या साहाय्याने पायाचे खोदकाम सुरू असताना, जमिनीखाली दगड आणि चुन्याने बांधलेला एक पक्का भुयारी मार्ग समोर आला. हे बांधकाम अत्यंत दर्जेदार असून जुन्या काळातील प्रगत स्थापत्यशास्त्राचा हा उत्तम नमुना मानला जात आहे.
नागरिकांची तुफान गर्दी अन् चर्चाही बातमी वाऱ्यासारखी पसरताच भुयारी मार्ग पाहण्यासाठी तलाव परिसराकडे हजारो नागरिकांनी धाव घेतली. वसमतला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे, त्यामुळे हा मार्ग नेमका कोठे जातो? ही तत्कालीन पाणीपुरवठा यंत्रणा आहे की युद्धाच्या काळातील गुप्त रस्ता? याबाबत नागरिकांमध्ये विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. काही ठिकाणी तर 'गुप्त धन' असल्याच्या अफवांनीही जोर धरला आहे.
पुरातत्व विभागाच्या तपासाची प्रतीक्षाहा भुयारी मार्ग कोणत्या कालखंडातील आहे आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व काय, हे पुरातत्व विभागाच्या तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. "हा मार्ग शहराच्या जुन्या खुणा अधोरेखित करतो, यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकणे गरजेचे आहे," अशी भावना माजी नगराध्यक्ष खलील अहमद सौदागर यांनी व्यक्त केली.
Web Summary : During lake repairs in Wasmat, an ancient tunnel was unearthed, sparking curiosity. The tunnel's purpose is unknown, fueling speculation about its historical significance and potential links to the past. Authorities are investigating.
Web Summary : वसमत में झील की मरम्मत के दौरान, एक प्राचीन सुरंग मिली, जिससे उत्सुकता बढ़ गई। सुरंग का उद्देश्य अज्ञात है, जो इसके ऐतिहासिक महत्व और अतीत से संभावित संबंधों के बारे में अटकलों को बढ़ावा दे रहा है। अधिकारी जांच कर रहे हैं।