शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली नगर पंचायत कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी वेतन कपातीस विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 19:07 IST

कोरोना काळात न. प. कर्मचारीही तेवढेच काम करीत असताना,त्यांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांच्या वारसांना अद्याप आर्थिक लाभ मिळाला नाही अनेक ठिकाणी दोन ते तीन महिने वेतन होत नाही.

हिंगोली : राज्यातील न. प., न. पं. कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन कापून मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यास विरोध दर्शविला असून, कोरोना काळात न. प. कर्मचारीही तेवढेच काम करीत असताना,त्यांच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आला आहे.

डॉक्टर व परिचारिका कोरोना रुग्णांची सेवा करीत आहेत. पोलीस, न. प. कर्मचारीही आपापल्या पातळीवर काम पाहात आहेत. मात्र, शासनाने न. प. कर्मचाऱ्यांचा विमा काढला नाही. तसेच अनेक न. प. कर्मचारी कोरोनात सेवा बजावताना दगावले असून, त्यांना कोणतीच आर्थिक मदतही दिली नाही. राज्यातील ३७९ न. प., न. पं.मधील मुख्याधिकाऱ्यांसह सफाई कामगार, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, प्रशासनातील अधिकारी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. मात्र, शासन स्तरावर या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार होत नाही. केवळ आश्वासनावर बोळवण केली जात आहे, असे निवेदनात म्हटले. निवेदनावर राज्याध्यक्ष विश्वनाथ घुगे, उपाध्यक्ष दीपक रोडे, सरचिटणीस रामेश्वर वाघमारे, धर्माजी खिल्लारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

ही आहेत विरोधाची कारणेराज्यात कोरोनाबाधित होऊन मृत्यू पावलेल्या ५४ न. प., न. पं. कर्मचाऱ्यांच्या वारसांना अद्याप आर्थिक लाभ मिळाला नाही, या कर्मचाऱ्यांना कोणतीही वैद्यकीय सेवा मिळत नाही तसेच वैद्यकीय प्रतिपूर्तीही होत नाही. अनेक ठिकाणी दोन ते तीन महिने वेतन होत नाही. त्यामुळे बाधित कर्मचाऱ्यांना उपचारासाठी पैसे नसल्याने जीव गमवावा लागत आहे. शासनही अर्थसहाय्य करीत नाही, कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानातून वेतन मिळते, थेट ट्रेझरीतून मिळण्याची व्यवस्था झाली नाही. तसेच १७ मार्चच्या निवेदनाचा अद्याप विचार झाला नाही. त्यामुळे वेतन कापण्यास विरोध असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :MONEYपैसाHingoliहिंगोलीChief Ministerमुख्यमंत्री