शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

Hingoli: सेनगाव आरोग्य कार्यालयाचा कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत वानरांनी घेतला ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 17:51 IST

मोठ्या प्रमाणात खुर्च्यांची फेकाफेकी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायलर

- राजकुमार देशमुखसेनगाव (हिंगोली) : येथील तालुका आरोग्य कार्यालयाचा कारभार पाहण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसून उपलब्ध मनुष्यबळ कार्यालयात हजर राहत नसल्याने थेट वानरांनी येथील तालुका कार्यालयाचा ताबा घेतल्याचा प्रकार १ ऑगस्ट रोजी दुपारी निदर्शनास आला. अतिशय गंभीर असणाऱ्या या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळावी, यासाठी शासन विविध नाविन्यपूर्ण योजना राबवित आहे. परंतु, ग्रामीण भागात आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी कोणीच हजर राहत नाही, अशी सातत्याने ओरड होत असते. आता तालुका आरोग्य कार्यालयातच कुणी उपलब्ध राहत नसल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे तालुका आरोग्य कार्यालय जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बेवारस सोडल्याने शुक्रवारी दुपारी या मोकळ्या कार्यालयाचा थेट वानरांनी ताबा घेतला. कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी हा प्रकार व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला.

त्यामुळे तालुका आरोग्य कार्यालयाच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहे. थेट कार्यालय बेवारस सोडल्याने आरोग्य यंत्रणा किती गंभीर आहे, याचा प्रत्यय समोर आला आहे. वरिष्ठ अधिकारी बैठकीला गेल्याची संधी साधत कर्मचारी बाहेर निघून गेल्याने वानरांनीच कार्यालयाचा ताबा घेतल्याचे चित्र सोशल मिडीयावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवरून स्पष्ट होत आहे. या प्रकाराची चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. कार्यालयात वानरे मुक्तपणे फिरत होती. तर वानरांनी काही खुर्च्याही पाडून टाकल्या होत्या. कार्यालयात एकही कर्मचारी नसल्याने वानरांचा सुमारे एक ते दीड तास मुक्त धुमाकूळ सूरू होता. अशा परिस्थितीत तालुका आरोग्य कार्यालय अधिकाऱ्यांनी जबाबदारी झटकत खालच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

...तर वेतन कपातीची कारवाई करणार - डाॅ.रूणवाल रुणवालसेनगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल म्हणाले की, हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी बैठकीसाठी गेलो होतो. जे कर्मचारी कार्यालयात गैरहजर होते त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागणार आहे. ज्यांचे खुलासे असमाधानकारक असतील त्यांच्यावर वेतन कपातीची कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीMonkeyमाकड