शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत कयाधू, आसना नदीला पूर तर औंढा तालुक्यात अतिवृष्टी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 13:02 IST

शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेली पावसाची संततधार शनिवारी सकाळी थांबली.

हिंगोली : शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेली पावसाची संततधार शनिवारी सकाळी थांबली. जिल्ह्यात सर्वदूर या पावसाने हजेरी लावली असून ४७ मिमी पावसाची नोंद झाली. औंढा तालुक्यात अतिवृष्टी झाली. कयाधू, आसना नदी दुथडी भरून वाहिली.

हिंगोली जिल्ह्यात आठ दिवसांची ओढ दिल्यानंतर अतिवृष्टीचा अनुभव शेतकऱ्यांना घ्यावा लागला. काल रात्रीपासूनच जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाचे आगमन झाले. त्यानंतर काही भागात पाऊस थांबला. मात्र वसमत, सेनगाव, औंढा तालुक्यात पहाटेपर्यंत संततधार सुरूच होती. यामुळे वसमत व औंढा तालुक्यातील अनेक ओढे, नाल्यांना पूर आला होता. हट्टा परिसरात तर सगळे नाले ओसंडून वाहत होते. त्यामुळे आसना नदीला पूर आला होता. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहात होते.

वसमत तालुक्यातही हट्टा, औंढा तालुक्यात येहळेगाव परिसरात हेच चित्र होते. हट्ट्यात १३२ तर येहळेगाव मंडळात १५२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर औंढा ९८, हिंगोली-७५, माळहिवरा-६९ मिमी अशी पाच मंडळात अतिवृष्टी झाली. अनेक ठिकाणी शेतांना तलावाचे स्वरुप आले. तर ओढ्याचे पाणी शेतात घुसल्याने अनेकांच्या जमिनीही खरडल्या आहेत.

जिल्ह्यात मंडळनिहाय पाऊस हिंगोली तालुक्यात ७५ मिमी, खांबाळा ५२ मिमी, माळहिवरा ६९ मिमी, सिरसम बु. ४८ मिमी, बासंबा ६५ मिमी, नर्सी नामदेव ५६ मिमी, डिग्रस क-हाळे  ३७ मिमी, तर कळमनुरी ४१ मिमी, नांदापूर ४५ मिमी,  आखाडा बाळापूर २५ मिमी, डोंगरकडा ८ मिमी, वारंगा फाटा १६ मिमी, सेनगाव २४ मिमी, गोरेगाव ६२मिमी, आजेगाव १५ मिमी, साखरा ३६ मिमी, पानकनेरगाव १६ मिमी, हत्ता १२ मिमी, तर वसमत २२ मिमी, हट्टा १३४ मिमी, गिरगाव २ मिमी, कुरुंदा ३५ मिमी, टेंभुर्णी १५ मिमी, आंबा २१ मिमी, औंढा नागनाथ ९८ मिमी, जवळा बाजार ५५ मिमी, यहळेगाव १५२ मिमी, साळणा ४८ मिमी असे एकूण ४७. ८९ एवढा सरासरी पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. 

टॅग्स :RainपाऊसHingoliहिंगोलीriverनदी