शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Hingoli: 'अखेरची ठरली वडिलांची भेट'; आदिवासी वसतिगृहात विद्यार्थिनीने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:05 IST

याप्रकरणी औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : तालुक्यातील पिंपळदरी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. ती पिंपळदरी येथील आदिवासी आश्रमशाळेत दहाव्या वर्गात शिक्षण घेत होती. याप्रकरणी औंढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. बुधवारी (दि. २५) रात्री ८ वाजेपर्यंत नातेवाइकांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी रोखून धरली होती.

पिंपळदरी येथे आदिवासी आश्रमशाळेत स्वाती सुखदेव झाटे हिने वसतिगृहातील सिलिंग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. घटनेची माहिती कळताच वसतिगृहाच्या अधीक्षकांनी गळफास काढून तिला तत्काळ पिंपळदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून स्वातीची अवस्था गंभीर असल्याने लागलीच हिंगोली येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले; परंतु त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. स्वाती झाटे ही पहिलीपासून या आश्रमशाळेत शिक्षण घेत होती.

अखेरची ठरली वडिलांची भेटवडील सुखदेव झाटे यांनी २४ जून रोजी पिंपळदरी येथे शाळेत तिला आणून घातले. जातीचे प्रमाणपत्र शाळेतच काढण्यात येत असल्यामुळे तिच्या वडील परत २५ जून रोजी सकाळी कागदपत्रे घेऊन आश्रमशाळेत आले आणि मुलीशी बोलून परतले. त्यानंतर दुपारच्या सत्रात स्वातीने इतर मुलींसोबत जेवण केले आणि मैत्रिणींना वसतिगृहाच्या खोलीमध्ये जाते म्हणून सांगितले. खोलीमध्ये गेल्यानंतर लागलीच तिने सिलिंग फॅनला ओढणी अडकवून गळफास घेतला.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी