शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

हिंगोलीत संततधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 6:20 PM

जिल्ह्यात ६ जून पासून संततधार पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे शेतातील पिकांना  मोठा फटका बसला आहे.

ठळक मुद्दे सोयाबीन पिवळे पडले असून त्याची वाढही खुंटली आहे. ज्वारी, कापूस, उडीद, मूग, हळद या पिकांचेही नुकसान झाले आहे.

हिंगोली : जिल्ह्यात ६ जून पासून संततधार पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यामुळे शेतातील पिकांना  मोठा फटका बसला आहे. सोयाबीन पिवळे पडले असून त्याची वाढही खुंटली आहे. तर ज्वारी, कापूस, उडीद, मूग, हळद या पिकांचेही नुकसान झाले आहे.

दहा ते बारा दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नसल्याने पिकांना उन्हाचीही आवश्यकता असते. मात्र १० दिवसांपासून ऊन नसल्याने पिकांना पिवळेपण आले आहे. दररोजच पाऊस बरसत असल्याने काही ठिकाणी  शेतात पाणी साचल्यामुळे तूर, सोयाबीन पिवळी पडून वाढ खुंटल्याचे चित्र आहे. पाणी साचलेल्या ठिकाणी कुठेकुठे जागीच थिजले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे या संततधार पावसाने मोठे नुकसान झाले आहे. शेतामध्ये पाणी साचले आहे. त्यातच वन्यप्राणीही फिरत असल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. पावसाने काही दिवस उघडीप दिल्यास शेतीचे कामे करता येतील, अशी अशा शेतकरी बाळगून आहेत. 

पावसामुळे आंतर मशागतीला ब्रेककळमनुरी  शहर व परिसरात मागील आठ ते दहा दिवसांपासून पावसाची रिमरिप सुरूच आहे. आतापर्यंत तालुक्यात ४४६ मी.मी. पाऊस पडला आहे. दररोजच पाऊस पडत असल्याने शेतातील आंतरमशागतीला ब्रेक लागला आहे. जमिनीतून पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे सोयाबीन, ज्वारी, तुर, मुग, उडीद आदी पिके पिवळी पडत आहेत.  

संततधार पावसामुळे पिके पाण्यात जवळा बाजार  परिसरात गत दहा ते बारा दिवसांपासून सतत रिमझीम पाऊस तर अधूनमधून दमदार पाऊस होत असल्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली असून शेतातील पिकांना तलावाचे स्वरुप आले आहे.

पिके कुजून जाण्याच्या मार्गावर वसमत तालुक्यातील कौठा  परिसरात संततधार पावसाचा आजचा तेरावा दिवस उजाडला असून या सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतातील सर्वच पिकांवर परिणाम झाला आहे. अतिपावसाने हळद, कापूस, सोयाबीन इ. पिकांना धोका निर्माण झाला आहे. 

ओल्या दुष्काळाचे सावट सेनगाव तालुक्यातील कडोळी परिसरातील गारखेडा, तपोवन, भगवती, माझोड, गुगूळपिंपरी आदी गावांवर यंदा ओल्या दुष्काळाचे सावट आहे. अतिपावसामुळे या भागातील हळद, कापूस, ज्वारी, सोयाबीन, तुरीसह सर्वच पिकांचे नुकसान होत आहे.  या भागात पावसाने दहा ते बारा दिवसांपासून आतापर्यंत उघडीप दिली नाही. दररोज पाऊस पडत आहे. यामुळे शेतात ज्या ठिकाणी पाणी साचते, अशा ठिकाणची पिके हातची गेली. 

 

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊसFarmerशेतकरी