शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हळदीच्या भावात एक हजाराची घसरण; शेतकऱ्यांची निराशा

By रमेश वाबळे | Updated: June 7, 2024 19:29 IST

मार्केट यार्डात १८५० क्विंटलची आवक

हिंगोली :  मराठवाड्यासह विदर्भात प्रसिद्ध असलेल्या येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात एप्रिल, मे मध्ये सरासरी १६ हजार ५०० रुपयांवर पोहोचलेल्या हळदीच्या दरात ७ जूनला एक हजार रुपयांची घसरण झाली. या दिवशी एक हजार ८५० क्विंटलची आवक झाली होती, तर सरासरी १४ हजार ६०० रुपये भाव मिळाला.

संत नामदेव मार्केट यार्डात सहा दिवसांच्या बंदनंतर ७ जूनला हळदीचे बीट झाले. शेतकऱ्यांनी बीट आणि मोजमाप लवकर व्हावे, यासाठी आदल्या दिवशी ६ जूनला शेतकऱ्यांनी मार्केट यार्ड गाठले होते. सहा दिवसांनंतर मार्केट यार्ड सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना भाववाढीची आशा होती. मात्र, क्विंटलमागे जवळपास एक हजार रुपयांनी भावात घसरण होऊन किमान १३ हजार ३०० ते जास्तीतजास्त १५ हजार ९०० रुपयांपर्यंत हळद विक्री झाली. गत आठवड्याच्या तुलनेत भाव पडल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली.

एप्रिल आणि मे मध्ये सरासरी भाव १६ हजार ५०० रुपयांपर्यंत गेले होते, तर जास्तीतजास्त १८ हजारांपर्यंत हळदीला भाव मिळाला होता. परंतु, भावात आणखी वाढ होईल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी हळद विक्रीविना ठेवली होती. परंतु, आता भावात घसरण होत आहे.

भुईमुगाची आवक वाढली...

जिल्ह्यातील बहुतांश भागातील भुईमूग काढणीचे काम आटोपले असून, शेतकरी आता भुईमूग शेंगा मोंढ्यात विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत आवक वाढली आहे. ७ जूनला एक हजार ३५० क्विंटल भुईमूग विक्रीसाठी आला होता. किमान ५ हजार ५०० ते कमाल ५ हजार ९०० रुपयांपर्यंत भाव मिळाला, तर सरासरी ५ हजार ७०० रुपये भाव राहिला. दरम्यान, भुईमूग तेलाच्या वाढत्या दराचा विचार केल्यास यंदा भुईमूग शेंगांना कमी भाव असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

३६१ क्विंटल हरभऱ्याची आवक...मोंढ्यात गत आठवड्याच्या तुलनेत हरभऱ्याची आवक मंदावली आहे. सरासरी ५०० ते ६०० क्विंटलची आवक होत होती. शुक्रवारी मात्र ३६१ क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. आवक मंदावली तरी भाव मात्र पूर्वीएवढेच आहेत. सध्या ६ हजार १६० ते ६ हजार ५४५ रुपयांचा भाव मिळत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी