शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली शहर पोलीस ठाणे बनले गोशाला; अनेकांनी सांभाळ करण्याचे दिले केवळ तोंडी आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 19:50 IST

कोल्यावरुन हैदराबाद मार्गे गुरांची वाहतूक होताना शहर पोलिसांनी एकूण ४० गुरे ताब्यात घेतली. मात्र गुरांचा सांभाळ करणाऱ्या विभागांसह गोशाळेचीही दारे ठोठावल्यानंतर काहीच प्रतीसाद मिळाला नसल्याने गुराचा एखांद्या धन्या सारखा सांभाळ करण्याची वेळ चक्क पोलिसांवरच येऊन ठेपली आहे.  

हिंगोली : अकोल्यावरुन हैदराबाद मार्गे गुरांची वाहतूक होताना शहर पोलिसांनी एकूण ४० गुरे ताब्यात घेतली. मात्र गुरांचा सांभाळ करणाऱ्या विभागांसह गोशाळेचीही दारे ठोठावल्यानंतर काहीच प्रतीसाद मिळाला नसल्याने गुराचा एखांद्या धन्या सारखा सांभाळ करण्याची वेळ चक्क पोलिसांवरच येऊन ठेपली आहे.  

गोवंश हत्या बंदी कायद्यांतर्गत कत्तलीकडे घेऊन जाणाऱ्या गुरांवर अनेक जण डोळा ठेवून आहेत. एखांद्या रस्त्याने जर गुरे घेऊन जाणारा ट्रक आढळला तर त्यांची माहिती थेट पोलिसांना दिली जाते.  असलाच एक अनुभव २३ मार्च रोजी मध्यरात्री ताब्यात घेतलेल्या गुरांच्या माध्यमातून आला आहे. या प्रकरणी गुन्हा तर दाखल झालाच आहे.  हे प्रकरण जरी कोर्टात गेले असले तरीही या गुरांना सांभाळायचा प्रश्न पोलिसांसमोर आ वासून आहे. या ठिकाणी गुरे सोडून घेण्यासाठी तर कोणी अद्याप आले नाही. मात्र पकडेल्या गुरांना चारा दाखवून फोटो काढणाऱ्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातील  दोन तीन वगळता सर्वच गुरांना मार लागलेला असल्याने यांना सांभाळायचेही कोणी धाडसच करीत नसल्याचे चित्र आहे. तीन गुरांच्या जखम चीघळ्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार केले आहेत. 

या ठिकाणी पोलीस कर्मचारी एका महिलेला देखरेखीसाठी ठेवलेले असले तरीही येता- जाताना कर्मचारी गुरांची पाहणी करत आहेत. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपासापेक्षा गुरांचा संभाळा पोलिसांना चांगलाच अवजड होऊन बसला आहे. गुरांच्या सांभाळासाठी जि. प. पशुसंवर्धन विभाग, नगर पालिका, वळूमाता पैदास केंद्र, जिल्हा कृषी विभाग आदी विभागाचे दारे ठोठावूनही काहीच प्रतीसाद मिळालेला नाही. एखांद्या धन्या सारखे या गुरांचा सांभाळ करण्याची वेळ पोलीस कर्मचाऱ्यांवर आली आहे. 

अनेकांकडून तोंडी मागणी अनेकांकडून गुरांची तोंडी मागणी होत असली तरीही गुरांमधून काही फायदा नसल्याने की काय? एकाही राजकीय पुढाऱ्यांने साधे पोलीस कर्मचाऱ्यांकडे गुरांची माहितीही विचारली नाही. तर १२ जानेवारी रोजी पकडलेली १७ गुरे हत्ता येथील गोशाळेत आहेत. ती गुरे परत घेण्यासाठी त्या गुरांच्या मालकाने पोलिसांकडे अर्ज केला त्यामुळे न्यायालयाने गुरे वापस करण्याचा आदेश दिला आहे. मात्र गोशाळा चालक तो पाळत नसून ३०० रुपये प्रमाणे गुरांचा खर्च मागत आहे. तर गुरांचा मालक ५० रुपये प्रमाणे खर्च देण्यास तयार असला तरी ते देण्यास तयार नाहीत.

उत्तराची प्रतीक्षा पोलीस प्रशासनाच्या वतीने गुरांच्या साभांळासाठी पत्राद्वारे विविध विभागाकडे मागणी केली आहे. त्या विभागाकडून मिळणाऱ्या उत्तराची प्रतीक्षा लागली आहे. काही विभागाने तर दुसऱ्या विभागाची दारे दाखवलेली आहेत. 

सांभाळण्यास गुरे घ्या गुरे म्हणण्याची आली वेळकत्तलीकडे घेऊन जाणाऱ्यां गुरांचा प्राण वाचविण्यात पोलिंसाना यश आले असले तरीही त्यांचा सांभाळ करणे आता चांगलेच अवघड होऊन बसले आहे. या ठिकाणी फोटो काढून घेणाऱ्यांची संख्या जास्त असली तरीही यांचा सांभाळ करतो असे म्हणणाऱ्यांची संख्या मोजकीच आहे. त्यामुळे गुरे सांभाळण्याची व्यवस्था असणाऱ्या विभागासह गोशाळेकडे धाव घेऊन सांभाळण्यास गुरे घ्या घ्या गुरे असे म्हणण्याची वेळ पोलीसांवर येऊन ठेपल्याचे पोउपनि तान्हाजी चेरले व पो. कॉ. प्रदीप जाधव यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. तर अनेकजण येथे मदतीसाठी धावत आहेत

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसhospitalहॉस्पिटलHingoli S Pपोलीस अधीक्षक, हिंगोली