शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यात चोरट्यांचा हैदोस; ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 00:51 IST

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ऐन सणासूदीत चोरट्यांनी हैदोस घातला आहे. दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी गेलेल्यांची घरे चोरट्यांनी फोडून लाखोंचा ऐवज तसेच सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. हिंगोली शहरालगतच्या गारमाळ परिसरात तसेच बासंबा येथे व कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथेही भरदिवसा धाडसी चोरी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ऐन सणासूदीत चोरट्यांनी हैदोस घातला आहे. दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी गेलेल्यांची घरे चोरट्यांनी फोडून लाखोंचा ऐवज तसेच सोने-चांदीचे दागिने लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. हिंगोली शहरालगतच्या गारमाळ परिसरात तसेच बासंबा येथे व कळमनुरी तालुक्यातील वारंगाफाटा येथेही भरदिवसा धाडसी चोरी झाली.दिवाळी सणानिमित्त अनेकजण बाहेरगावी गेल्याने चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड तसेच सोने चांदीचे असा लाखोंचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी विविध ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.हिंगोली शहरालगतच्या गारमाळ परिसरातील गंगूबाई रमजान चौधरी यांच्या घराचे चोरट्यांनी कूलूप तोडून सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बासंबा येथेही चोरीच्या घटना४बासंबा : येथील नवी आबादीत चोरीची घटना घडली. केशव घुगे यांच्या घरातून २ लाखांची रोकड व २ लाख ७२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. तसेच बन्सी घुगे यांच्या घरातून ५ हजारांची रोकड व ५२ हजारांचे सोन्याचे दागिने तर ज्ञानेश्वर पाटनकर यांच्या घरातून ९ हजाराचा दिड क्विंटल कापूस चोरट्यांनी लंपास केला. एकूण ५ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.वारंगा फाटा येथे भर दिवसा धाडसी चोरी; रोकड, दागिने लंपास४वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील भवानी नगरमध्ये दोन घरांमध्ये भरदिवसा धाडसी चोरी करून ३ लाख ८८ हजार ८00 रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील डॉ. पांडुरंग मारोतराव हेंद्रे यांची पत्नी व मुले दिवाळी सणानिमित्त माहेरी गेले होते. ९ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे डॉक्टर हेंद्रे वारंगा फाटा येथे सकाळी १० वाजता दवाखान्यात वैद्यकीय सेवेसाठी गेले. या संधीचा चोरट्यांनी फायदा घेत सोने-चांदी व रोख रक्कम चोरून डल्ला मारला. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरी परत आले असता गेटचे कुलूप, मुख्य दरवाजाची कडी व कपाट उघडले असता लॉकर तोडलेले त्यांना दिसले. कपाटातील दागिने व रोख रकमेची पाहणी केली असता त्यातील विविध प्रकारचे सोन्याचे ३ लाख १३ हजार ८00 रुपयांचे दागिने व १५ हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. दरम्यान, शेजारीच असलेले ओमकार किशनराव वंजे यांच्याही घराचे कुलूप तोडून लॉकरमधील ७५ हजार ८00 रुपयांचे सोन्याचे दागिने व ६० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याचे समजले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच बाळापूर ठाण्याचे पोनि व्यंकटेश केंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी ठसेतज्ञ व श्वानपथकास पाचारण केले. परंतु त्या ठिकाणी श्वानास कुठलाही माग लागला नाही. डॉ. पांडुरंग हेंद्रे यांच्या फियार्दीवरून बाळापूर ठाण्यात धाडसी चोरीच्या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोनि व्यंकटेश केंद्रे करीत आहेत. मागील काही वर्षांपासून वारंगा फाटा येथे दुकानांमध्ये चोºयांचे घटना घडल्या होत्या. परंतु चोरींच्या घटना रात्रीच्या वेळी घडल्या होत्या. मात्र आता भरदिवसा चोरट्यांनी केलेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरीच्या घटनेचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी