शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

Video: जलप्रकोप! हिंगोलीतील अख्खे कुरुंदा गाव पाण्याखाली; आश्रयासाठी ग्रामस्थांची धावाधाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 07:29 IST

कुरुंदा गाव पाण्याखाली: 2016 ची झाली पुनरावृत्ती 

- इब्राहिम जहागीरदार

कुरुंदा ( जिल्हा हिंगोली) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गावात पाणी घुसले असून हजारो घरांचे नुकसान झाले आहे. गुरे वाहून गेली, वाहने वाहून गेली तर गाव सकाळी सात वाजेपर्यंत पाण्याखालीच असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

 वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे गावाजवळून आसना नदी वाहते. या नदीला संरक्षक भिंत आणखी उंचीची करण्याची मागणी आहे. मात्र ती काही झाली नाही गावात पुराचे पाणी शिरण्याचा प्रकार यामुळे घडतो. मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास असे घडत असल्याने प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नव्हते. 2016 मध्ये कुरुंदा गाव पाण्याखाली गेले होते, तेव्हाही करोडो रुपयांची हानी झाली होती. यावेळीही तीच परिस्थिती उद्भवली आहे. अनेकांची घरे पडली गुरे वाहून गेली शेतातील पिके वाहून गेली. आखाड्यावरील साहित्य वाहून गेले एवढेच काय तर गावामध्ये रस्त्यावर लावलेली वाहनही वाहून गेली. काहींची वाहने एकमेकाला अडकून नदी नजीकच्या रस्त्यावर आढळून आली.

जुनी मातीची घरे पडल्याने मोठे नुकसान झाले. नदीला अचानक पूर आल्याने काही जणांची गुरे गोठ्यातच मरून पडली. बकऱ्या, कोंबड्याही मोठ्या प्रमाणात बळी गेला. या प्रकारामुळे काही जणांना रात्र जागून काढावी लागली आहे आज सकाळी सुद्धा गावातील अनेक रस्त्यावर कमरे इतके पाणी असल्याने नागरिकांना पाण्याखाली गेलेले संसार सावरण्यासाठी काहीच करता येत नसल्याचे दिसून येत होते.

मिळेल तेथे घेतला आश्रय

कुरुंदा गावात रात्री दोन वाजेपासून पुराचे थैमान सुरू होते  जिकडे तिकडे हाहाकार पसरला होता. एक मजली घर असलेल्यांना जीव वाचवायचा कसा? असा प्रश्न पडला होता घरात पाणी घुसले रस्त्यावर वेगाने पाणी वाहत होते  त्यामुळे कोणी शेजाऱ्याकडे दुसऱ्या मजल्यावर आसरा घेतला. तर काहींनी उंच भागातील शाळा ग्रामपंचायत इमारत आधी ठिकाणी आश्रय घेतल्याचे चित्र आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊसHingoliहिंगोली