विराट लोकमंचच्या वतीने यावर्षी तिसऱ्या महाआरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत आरोग्य तपासणी करून वैद्यकीय सल्ला, मोफत औषधी उपचार व आवश्यक शस्त्रक्रियेकरिता सहकार्य करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये बालरोग आजार, दंतरोग आजार, अस्थिरोग, नेत्ररोग, कान-नाक-घसा, चर्मरोग, स्त्रीरोग आजाराची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करून मोफत औषधी व उपचार करण्यात येणार आहेत. या शिबिरात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी वैद्यकीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक व इतर तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. या शिबिरामध्ये आयुष्यमान भारत योजनेंतर्गत शासनाच्या वतीने ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची योजना राबवीत त्याची नोंदणी करून मोफत कार्ड वाटप करण्यात येणार आहे. हिंगोलीत आयाेजित आराेग्य शिबिराचा गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन विराट राष्ट्रीय लोकमंचचे शेख नईम शेख लाल यांच्या वतीने करण्यात आले आहे.
हिंगाेलीत शुक्रवारी महाआराेग्य व रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:15 IST