शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांत आनंदोत्सव! वसमतच्या मोंढ्यात हळद पुन्हा ३० हजारांवर पोहोचली

By विजय पाटील | Updated: August 8, 2023 19:33 IST

१३ हजार ते २१ हजारापर्यंत काही लॉट सुटले; ७ हजार कट्ट्यांची झाली आवक

- इस्माईल जाहागिरदारवसमत (जि. हिंगोली): येथील कृऊबा बाजार समिती मोंढ्यात हळदीचे दर उच्चांकी गाठत आहेत. मोंढ्यात मंगळवारी ७ हजार कट्ट्यांची आवक झाली. बोली बिटात १३ हजार ते ३० हजार १०० रुपयांपर्यंत हळदीला दर मिळाला. यापूर्वीही बिटात हळद ३० हजार रुपयांवर हळद गेली होती. गत ५ दिवसांत हळदीचा डबा घसरला होता. मंगळवारी झालेल्या बिटात सर्वाधिक ३० हजार १०० व त्यानंतर २१ हजारांचा दर हळदीस मिळाला. 

वसमतच्या मोंढ्यात गत पाच दिवसापासून हळदीचे दर १५ हजारावरही जात नव्हते. ८ ऑगस्ट रोजी हळदीच्या ७ हजार कट्ट्यांची आवक झाली.  हळदीचे बोली बिट झाले तेंव्हा बिटात हळदीस १३ हजार ते २१ हजार रुपयांचा दर मिळाला. शेतकरी व्यंकटेश कदम (रा. रोडगा) यांच्या दर्जेदार हळदीच्या ५१ कट्ट्यांना ३० हजार १०० रुपयांचा दर मिळाला. गत पाच दिवसांपासून हळदीचे दर स्थिर होते. मंगळवारी आवक मोठ्या प्रमाणात झाली. दिवसेंदिवस हळदीचे दर वाढत असल्याने ज्यांच्याकडे हळद शिल्लक आह, अशा शेतकऱ्यांत आनंद व्यक्त केला जात आहे. मोंढ्यात हळदीला उच्चांकी दर मिळत असल्याने नांदेड, परभणी जिल्ह्यांसह इतर भागातील हळद वसमतच्या मोंढ्यात विक्रीसाठी येत आहे.

उच्चांकी दराचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा ....८ ऑगस्ट रोजी कृऊबा समीती मोंढ्यातील बिटात पुन्हा सर्वाधिक ३० हजार १०० रुपयांवर दर्जेदार हळदीस दर मिळाला. शेतकऱ्यांनी शेतीमाल मोंढ्यात विक्री करुन हळद दराच्या तेजीचा फायदा घ्यावा.-तानाजी बेंडे, सभापती, कृउबा वसमत

हळदीचे दर यापेक्षाही वाढतील...दर्जेदार हळदीस उच्चांकी दर मिळत आहे. ८ ऑगस्ट रोजी झालेल्या बोली बिटात ५१ कट्ट्यांच्या लॉटला ३० हजार १०० रुपयांचा दर मिळाला आहे. दर्जेदार हळीचे दर यापुढेही वाढतील, अशी अशा आहे. - पुष्पेंद्र अकरबोटे, व्यापारी, वसमत

३० हजार १०० रुपये दर चांगलाच...कृऊबा समीती मोंढ्यात दर्जेदार हळदीचे ५१ कट्टे बिटात टाकले होते. हळद दर्जेदार व चांगली होती. ३० हजार १०० दर मिळाला. हा दर मिळेल असे वाटले नव्हते.- व्यंकटेश कदम, शेतकरी, रा.रोडगा.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी