शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळा जपून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:43 AM

उन्हाळा सुरू होताच उकाड्यापासून सुटका व्हावी यासाठी घरो-घरी दुकान, कार्यालये व जवळपास प्रत्येक ठिकाणी कूलरचा वापर केला जातो. मात्र कूलर वापरताना काळजी न घेतल्याने विजेचा धक्का लागून दरवर्षी अनेक दुर्घटना घडून अपघात काहींचा मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी नागरिकांनी कुलर वापरताना योग्य ती काळजी घेणे महत्वाचे आहे. निष्काळजीपणा जीवघेणाही ठरू शकतो त्यामुळे कुलरचा काळजीपूर्वक वापर करावा असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : उन्हाळा सुरू होताच उकाड्यापासून सुटका व्हावी यासाठी घरो-घरी दुकान, कार्यालये व जवळपास प्रत्येक ठिकाणी कूलरचा वापर केला जातो. मात्र कूलर वापरताना काळजी न घेतल्याने विजेचा धक्का लागून दरवर्षी अनेक दुर्घटना घडून अपघात काहींचा मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी नागरिकांनी कुलर वापरताना योग्य ती काळजी घेणे महत्वाचे आहे. निष्काळजीपणा जीवघेणाही ठरू शकतो त्यामुळे कुलरचा काळजीपूर्वक वापर करावा असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.कूलरमधील माहिती नसल्यास कनेक्शन बदल करू नये. कूलरची दुरुस्ती चालू अवस्थेत न करता प्लग काढून नंतरच काम करावे. प्लगला जोडलेली वायर खंडित वा जीर्ण झालेली असल्यास बदलून दुसरी लावावी. अनेकदा पाण्याची पातळी खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी ओढले जात नाही व तो पंप एअर लॉक होतो. अशावेळी प्रायमिंग करणे आवश्यक असते. मात्र चालू पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे. कूलर हलवताना प्लग पिन काढून नंतरच त्याची हालचाल करावी. कूलर पंप अधूनमधून बंद करावा. कूलरच्या लोखंडी बाह्यभागात वीजप्रवाह उतरू नये यासाठी कूलरचा थेट जमिनीशी संपर्क येईल, अशी व्यवस्था करावी; जेणेकरून कूलरच्या लोखंडी बाह्यभागात वीजप्रवाह उतरल्यास त्याचा धक्का बसणार नाही. घरामध्ये अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर बसवून घ्यावे. कूलर पूर्णपणे सुरक्षित हाताळल्यास होणाऱ्या दुर्घटना रोखू शकणे शक्य आहे. त्यामुळे सुरक्षित वापर करण्याचे आवाहन केले आहे.कूलरसाठी नेहमी थ्री-पिन प्लगचा वापर करावा. कूलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करून प्लग काढून ठेवावा, त्यामुळे कुलरचा विजेशी काहीही संबंध राहणार नाही. पाणी भरताना ते टाकीच्या खाली सांडून बाजूला जमिनीवर पसरणार नाही, याची खबरदारी घ्यावी. पाणी भरल्यानंतर प्लग पिन लावून स्वीच चालू करावे. त्यानंतर कूलरच्या कुठल्याही भागाला स्पर्श करू नये. कूलरचे कनेक्शन व वायरिंग अधिकृत कारागिराकडून तपासून घ्यावे. अर्थिंगची तपासणी करून घ्यावी. अर्थिंग व्यवस्थित असल्यास लिकेज करंट येत नाही. कुलरच्या आतील वायर पाण्यामध्ये बुडणार नाही याची काळजी घ्यावी. पंपातून पाणी येत असल्यास वीजपुरवठा बंद करून नंतरच कूलरला हात लावावा. ओल्या हातांनी कुलरला कधीही स्पर्श करू नये. लहान मुलांना नेहमी सुरक्षित अंतरावर ठेवावे व ते या ठिकाणी खेळणार नाहीत, याबाबत दक्षता घ्यावी. पाण्याचा पंप ५ मिनिटे सुरू आणि १० मिनिटे बंद ठेवणाºया इलेक्ट्रिक सर्किटचा वापर करावा. त्यामुळे विजेची बचत होते, असे महावितरण तर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण