हिंगोली शहरातील मंगळवारा बाजार भागातील एकाकडे गुटख्याचा साठा असल्याची माहिती हिंगोली शहर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून ९ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शहर पोलिसांच्या पथकाने मंगळवारा बाजार भागातील भगतबुवाच्या विहिरीजवळील बाळू अशोक कांदे यांच्या घरी पोलिसांनी छापा टाकला. यावेळी त्याच्या घरात १ लाख ४६ हजार १९० रुपये किमतीचा विमल पान मसाला गुटखा व तंबाखू याचे १ हजार २३० पाकिटे आढळून आली. पोलिसांनी गुटखा जप्त करून शहर पोलीस ठाण्यात आणला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कांबळे यांच्या फिर्यादीवरून बाळू अशोक कांदे याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक गंगाधर बनसोडे, पोना सतीश जाधव, संदीप जाधव, ब्रह्माजी अंभोरे यांच्या पथकाने केली.
फोटो आहे