सेनगाव: येथील पंचायत समितीच्या मासिक बैठकीला खुद्द बैठकीचे सचिव असलेले गटविकास अधिकारी गैरहजर राहिले. यामुळे बुधवारी उपस्थित असलेल्या पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करीत सर्वानुमते बैठक तहकूब करण्याचा निर्णय घेतला.
६ जानेवारी रोजी पंचायत समितीच्या मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीला नियोजितवेळी सभापती छाया हेंबाडे,उपसभापती अरुणा गडदे,पंचायत समिती सदस्य स्वाती पोहकर, संतोष खोडके, अशोक जिरवणकर, सुनील मुदंडा, ॲड. केशव भालेराव, रायाजी चोपडे, खुशाल हराळ यांच्यासह दहा सदस्य उपस्थितीत होत. परंतु, बैठकीला सचिव म्हणून उपस्थितीत राहणारे गटविकास अधिकारी एस. आर. बेले हे ऐन वेळी गैरहजर राहिले. त्यामुळे सभापती, उपसभापती सह अन्य सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.जवाबदार अधिकारी बैठकीचे नियोजन करून ऐन वेळी गैरहजर राहत असल्याने सदस्यांनी सहाय्यक गटविकास अधिकारी एम.के.कोकाटे यांना धारेवर धरले.सहाय्यक गटविकास अधिकारी कोकाटे हे पदाधिकाऱ्यांचे समाधान करु शकले नाही.त्या मुळे सदस्यांनी सर्वानुमते बैठकीचे पदसिद्ध सचिव.उपस्थितीत राहत नाही.तो पर्यंत बैठकीत सहभागी होणार नसल्याची भुमिका घेत बैठक तहकूब केली.
या संबंधी सहाय्यक गटविकास अधिकारी कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता गटविकास अधिकारी बेले यांना शासकीय कामासाठी अचानक मुंबई येथे जावे लागले. त्यामुळे बैठकीला उपस्थितीत राहू शकले नाही. बैठकीसाठी मला प्राधिकृत केले होते.परंतु बैठक गटविकास नसल्याने तहकूब करण्यात आली असल्याचे सांगितले.
फोटो नं. ३