शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळीत १.२७ मीटरने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 23:34 IST

दिवसेंदिवस सूर्य आग ओकत असून जिल्ह्याची भूजल पातळी १.२७ मीटरने खालावली आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : दिवसेंदिवस सूर्य आग ओकत असून जिल्ह्याची भूजल पातळी १.२७ मीटरने खालावली आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहरासह ग्रामीण भागातील विहिरी व बोअर आटत चालल्या असून भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून मे महिन्या शेवटच्या आठवड्यात भूजल पातळीचे मोजमाप केले जाणार आहे.दरवर्षी अत्यल्प पर्जन्यमान होत असून भूजलपातळी खालावत चालली आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील ५० निरीक्षण विहिरींतील पाणीपातळीच्या नोंदी घेतल्या जातात. भूजल सर्वेक्षण यंत्रणेकडून मार्चमध्ये घेण्यात आलेल्या नोंदीनुसार हिंगोली तालुक्यातील भूजलपातळी १.५० मीटर खोलीवर गेल्याचे दिसून आले. औंढा नागनाथ तालुक्यात १.४९ मीटर, वसमत तालुक्याची २.०७ मीटर, कळमनुरी ०.२५ मीटर, १.०३ मीटर असून जिल्ह्याची भूजल पातळी -१.२७ मीटरने खालावली आहे. यात औंढा-९.६४ मीटर, वसमत-१४.५0, हिंगोली ९.७७, कळमनुरी-९.0६, सेनगाव ९.९७ मीटर या खोलीवर पाणी आहे. भूजलपातळी खालावत असल्यामुळे विहिरी, बोअर कोरडे पडत चालले आहेत. त्यामुळे अनेक गावांत वाड्या-वस्त्या, तांड्यावर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. भूजलपातळीतील घट जलसंकट निर्माण करणार हे निश्चित आहे. यावर उपाय-योजना केल्या जात आहेत. जि. प.च्या यांत्रिकी विभागातर्फे ग्रामीण भागात २४ एप्रिलपासून बोअर घेण्याचे काम सुरू आहे. परंतु अनेक बोअर कोरडे जात असून काही बोअरला पाणी लागत आहे, अशी माहिती मिळाली. भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत घेतलेल्या निरीक्षण विहिरीतील नोंदीवरून तालुकानिहाय भूजल पातळीतील घट जाहीर करण्यात आली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ५० गावांतील निरीक्षण विहिरींची भूजल पातळी घेण्यात येणार असल्याचे यंत्रणेमार्फत सांगण्यात आले.जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातर्फे २४ एप्रिलपासून ग्रामीण भागात नवीन बोअर घेण्याचे कामे सुरू आहेत. बोअरसाठी एकूण जवळपास १७७ प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी ९४ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून सध्या बोअरची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.आतापर्यंत ४० बोअरची कामे पूर्ण झाली आहेत. लवकरच बोअरवर हातपंप बसविले जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे. परंतु भूजलपातळीच घटल्याने अनेक ठिकाणचे बोअर कोरडे जात आहेत.जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण यंत्रणेमार्फत ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करण्यासाठी तसेच शासनाच्या विविध उपाय-योजना राबविण्यात येत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणी