ग्रामपंचायत निवडणूक; मतमोजणीच्या ठिकाणची क्षणचित्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:31 AM2021-01-19T04:31:37+5:302021-01-19T04:31:37+5:30

उमेदवार विजयी झाल्याची माहिती कळताच, बाहेर जमा झालेले कार्यकर्ते मोठ्याने ओरडून विजयी उमेदवाराचे स्वागत करताना दिसून येत होते. एवढेच ...

Gram Panchayat elections; Highlights of the polling station | ग्रामपंचायत निवडणूक; मतमोजणीच्या ठिकाणची क्षणचित्रे

ग्रामपंचायत निवडणूक; मतमोजणीच्या ठिकाणची क्षणचित्रे

Next

उमेदवार विजयी झाल्याची माहिती कळताच, बाहेर जमा झालेले कार्यकर्ते मोठ्याने ओरडून विजयी उमेदवाराचे स्वागत करताना दिसून येत होते. एवढेच नाही, तर एकमेकांच्या अंगावरही पडताना पाहायला मिळाले.

परिसरातील दुकाने बंद ठेवली

ग्रामपंचायतीची मतमोजणी कल्याण मंडप येथे असल्यामुळे परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. या परिसरात कोणालाही येण्यास मज्जाव करण्यात आला होता. बँक इतर कार्यालय मात्र सुरू होती.

कार्यकर्त्यांतून वाहने सुरूच

कल्याण मंडपासमोरील रस्ता बंद केल्याने कार्यकर्ते विश्रामगृहाच्या समोर जल्लोष करत होते. यावेळी शिवाजीनगरकडून येणारी वाहने मात्र सोडण्यात येत होती. यामुळे वाहनचालकांना बराच वेळ येथे थांबावे लागत होते.

गळ्यातील रुमाल कमरेला

उमेदवारांच्या जल्लोषासाठी आलेले कार्यकर्ते सकाळी नऊ वाजल्यापासून कल्याण मंडपजवळ जमा झाले होते. उमेदवार विजयी झाल्याचे समजताच, काही कार्यकर्त्यांनी गळ्यातील रुमाल कमरेला बांधून नृत्य सुरू केल्याचे पाहायला मिळाले.

गुलाला उधळण्याचे प्रमाण जास्त

उमेदवार विजयी झाल्याचे कळताच काही कार्यकर्ते आनंदाच्या भरात गुलाल उधळत होते. काही जण गुलाल कपाळाला लावण्याऐवजी जमलेल्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर टाकत होते. विजयी उमेदवाराने सांगितल्यानंतर काहींनी गुलाल उधळणे बंद केल्याचे पाहायला मिळाले.

काठी फिरताच कार्यककर्ते पळू लागले

गर्दी करू नका, असे पोलिसांनी सांगूनही काही कार्यकर्ते आखून दिलेली सीमारेषा ओलांडत होते. अशा वेळी पोलिसांनी काठी फिरवताच आणि शिट्टी वाजवताच जमलेले कार्यकर्ते पळू लागल्याचे दृश्य मतमोजणी ठिकाणी पहायला मिळाले.

Web Title: Gram Panchayat elections; Highlights of the polling station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.