शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

हळूहळू वाढतेय कामांची गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:12 IST

मग्रारोहयोतूनच समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत ११ कलमी कार्यक्रमात कामे मंजूर होवून तशीच पडून होती. आता काही कामे पूर्ण झाली असली तरीही कामे सुरू होण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांपर्यंत गेल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मग्रारोहयोतूनच समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेत ११ कलमी कार्यक्रमात कामे मंजूर होवून तशीच पडून होती. आता काही कामे पूर्ण झाली असली तरीही कामे सुरू होण्याचे प्रमाण पन्नास टक्क्यांपर्यंत गेल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.समृद्ध महाराष्ट्रमधील कामांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या मागे मागील तीन वर्षांपासून लागले आहेत. त्यात आता हळूहळू यश येत आहे. मागील काही महिन्यांत ही कामे सुरू होत असल्याचे तर सकारात्मक चित्र दिसू लागले आहे. सिंचन विहिरींची दहा हजारांपैकी ४३९१ कामे प्रशासकीय मान्यतेसह मंजूर केली. त्यापैकी २२४७ चालू असून याशिवाय ३७५ कामे पूर्ण झाली आहेत. यंदा दुष्काळात शेतकऱ्यांना या विहिरींचा फायदा झाला असता मात्र कामे पूर्ण होण्याचे प्रमाण कमी आहे. १७६९ कामांना तर प्रारंभच नाही. अनेक गावांत उद्दिष्ट संपल्याचे सांगून नवीन काम दिले जात नाही. तर अनेक गावांत शेतकरी मंजूर आहे तेच काम करीत नाहीत. शेततळ्यांचे तर ५६00 एवढे उद्दिष्ट असताना केवळ ३२२ कामांनाच प्रशासकीय मंजुरी दिलेली आहे. यातील एकही काम अद्याप सुरू नाही. भूसंजीवनी व्हर्मी कंपोस्टिंगच्या २२00 एवढ्या उद्दिष्टापैकी ३७३ कामे प्रशासकीय मंजुरीनंतर सज्ज आहेत. मात्र यापैकी केवळ तीन कामेच सुरू झाली आहेत. भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंगचे २२00 कामांचे उद्दिष्ट असून यापैकी ४६६ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. तर १५ कामे सुरू झाली असून २ पूर्ण झाली आहेत. निर्मल शौचालय योजनेतही २२00 चे उद्दिष्ट असून २२६ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी १२0 कामे सुरू असून ८ पूर्ण झाली आहेत. निर्मल शोषखड्ड्यांचे २000 एवढे उद्दिष्ट असून ८८१ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. यापैकी ४८७ सुरू तर ५0 पूर्ण झाली आहेत.अंकुर रोपवाटिकेच्या २ लाख २0 हजारांच्या उद्दिष्टापैकी प्रस्तावच ६५ आहेत. त्यापैकी ६0 कामांना मंजुरी दिली. यातील ५५ सुरू झाली तर ४ पूर्ण झाली आहेत. नंदनवन वृक्षलागवडीतही १६00 कामांचे उद्दिष्ट असून २३ कामांना प्रशासकीय मान्यता दिली. यापैकी १८ कामे सुरू असून ५ सुरूच नाहीत. समृद्ध ग्राम योजनेतही १६00 पैकी ३६९ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली. २७१ कामे सुरू असून याशिवाय ९0 कामे पूर्ण झाली आहेत. शेततळे, गाव तलाव, वृक्षलागवड, व्हर्मी कंपोस्टिंग, कल्पवृक्ष फळबाग लागवड यातील एकही काम पूर्ण झालेले नाही.दरवर्षी मजूर नसल्याची बोंब कायम असते. यंदा मात्र दुष्काळी स्थितीमुळे शेतीत इतर कामे नसल्याने शेतकºयांत जनजागृती केल्यास त्यांच्याकडूनच ही कामे करून घेणे शक्य आहे. प्रशासनाने ही संधी साधण्याची गरज आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीSmart Cityस्मार्ट सिटी