शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीतील आदिवासी प्रकल्पाच्या कामांचे राज्यपालांनी केले कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 14:03 IST

Governor Bhagat Singh Koshyari in Hingoli : मागासलेल्या, आदिवासीबहुल भागाचा आढावा घेणे, सिंचन, पिण्याचे पाणी, शिक्षण आदी प्रश्नांवर जाण करून घेत त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी माझ्याकडे

ठळक मुद्देराज्यपालांनी सिंचनानंतर आदिवासींबाबतच्या उपाययोजनांच्या आढाव्यावर भर दिला.

हिंगोली : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) यांनी हिंगोली येथील विश्रामगृहावर विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी आदिवासी विकास प्रकल्पाकडे विशेष लक्ष देवून माहिती घेतली. या विभागाचे चांगले काम असल्याची कौतुकाची थापही प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांच्या पाठीवर मारली.

हिंगोली येथे सकाळी ११ वाजेच्या दरम्यान आगमन होताच त्यांना पोलीस दलाकडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी विश्रामगृहात सिंचनासह विविध बाबींचा आढावा घेतला. राज्यपालांनी सिंचनानंतर आदिवासींबाबतच्या उपाययोजनांच्या आढाव्यावर भर दिला. यावेळी प्रकल्प अधिकारी राठोड यांनी आदिवासी मुलांच्या शिक्षणाची जिल्ह्यात असलेली व्यवस्था, शिक्षणाबाबत या प्रकल्पाला मिळालेले पंतप्रधान अॅवॉर्ड आदीची माहिती दिली. तसेच या विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या शबरी घरकुल योजना, चालकांना ऑटोचे वितरण, फर्निचर मेकिंग प्रशिक्षण आदींचीही माहिती दिली. तसेच यात किती लाभार्थ्यांना कसा लाभ मिळाला, हेही सांगितले. यावरून राज्यपाल कोश्यारी यांनी राठोड यांच्या कामाचे कौतुक केले. 

तसेच या विभागात किती वर्षांपासून काम करता, आयएएस आहेत का? मूळचे कोणत्या विभागाचे, तुमचे गाव कोणते व कोणत्या जिल्ह्यात असेही आपुलकीने विचारले. तसेच या विभागात आणखी काम करा, असेही सांगितले. राठोड हे मागील चार वर्षांपासून या विभागात असून मूळ ग्रामविकासचे असले तरीही आदिवासी प्रकल्पाचा त्यांच्याकडे पदभार आहे. या ठिकाणी प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बर्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, आ.तान्हाजी मुटकुळे आदींची उपस्थिती होती. तर जवळपास सर्वच विभागांच्या प्रमुखांचीही उपस्थिती होती. हा आढावा घेतल्यानंतर त्यांनी काही जणांची निवेदनेही स्वीकारली. 

एका रस्त्यावर बाजारपेठ बंदहिंगोलीतील विश्रामगृह ते नांदेड नाका रस्त्यावरील बाजारपेठ या दौऱ्यासाठी बंद ठेवण्यात आली होती. तर राज्यपालाच्या दौऱ्यामुळे या मार्गावरील वाहतूकही इतरत्र वळविण्यात आली होती. जोपर्यंत राज्यपाल विश्रामगृहावर होते, तोपर्यंत तेवढाच रस्ता बंद ठेवून नंतर वाहतूक सुरळीत केली. 

सिंचनाच्या प्रश्नावर सरकारला सूचना देवू पत्रकारांशी बोलताना राज्यपाल कोश्यारी म्हणाले, राज्यपाल म्हणून मला मागासलेल्या, आदिवासीबहुल भागाचा आढावा घेणे, सिंचन, पिण्याचे पाणी, शिक्षण आदी प्रश्नांवर जाण करून घेत त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार मी या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर आलो आहे. ही सर्व माहिती घेतली तर राज्य व केंद्र सरकारशी बोलता येते. त्यावर निर्णय घेता येतात. या भागात काही अपूर्ण सिंचन योजना आहेत. मावेजा कमी मिळत असल्याने शेतकरी जमिनी देत नाहीत. शासन आता चारपट रक्कम मावेजा म्हणून देत आहे. पूर्वी कमी असायचा. त्यावर शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे. अन्यथा सक्तीने भूसंपादन केले तरच हे विकास प्रकल्प होणार आहेत. यावर शासनाला निर्णय घ्यावा लागेल.

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीHingoliहिंगोली