शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाची मागणी अमान्य केल्याने मुलीच्या पित्याची हत्या  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 15:24 IST

लग्नाचा प्रस्ताव अमान्य केल्याने मुलीच्या पित्याची युवकाच्या नातेवाईकाने मारहाण करून हत्या केल्याची घटना तालुक्यातील दाताडा( बु ) येथे शुक्रवारी (दि.९ ) घडली.

सेनगाव (हिंगोली ) : लग्नाचा प्रस्ताव अमान्य केल्याने मुलीच्या पित्याची युवकाच्या नातेवाईकाने मारहाण करून हत्या केल्याची घटना तालुक्यातील दाताडा( बु ) येथे शुक्रवारी (दि.९ ) घडली. कैलास माणिकराव शिंदे (४५) असे मृताचे नाव असून या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाताडा (बु) येथील कैलास माणिकराव शिंदे यांच्या मुलीस गावातीलच सचिन नारायण सुरनर याने लग्नाची मागणी घातली. परंतु, शिंदे यांनी सचिन व्यसनाधीन असल्याने लग्नाचा प्रस्ताव अमान्य केला. लग्नाचा प्रस्ताव अमान्य केल्याने समाजात आपली बदनामी झाली असा राग मनात धरून सचिन व त्याच्या नातेवाईकांनी शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास शिंदे यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांच्या पोटात चाकूचे वार केले. गंभीर जखमी झालेल्या शिंदे यांना वाचविण्यासाठी त्यांचा भाऊ भुजंग गेला असता त्यालाही मारहाण करण्यात आली.  

गंभीर जखमी शिंदे व त्यांचे भाऊ भुजंग यांना उपचारासाठी हिगोली येथे दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान कैलास शिंदे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात मृताचा मुलगा अमोल माणिक शिंदे याने फिर्याद दिली. यावरून सचिन सुरनर, किरण सुरनर, नितीन कवडे, विश्वनाथ कवडे, गणेश कवडे या पाच जणाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फौजदार बाबुराव जाधव हे करत आहेत.

टॅग्स :MurderखूनHingoliहिंगोलीPoliceपोलिसmarriageलग्न