शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ युवतीचा रेल्वेतून पडून मृत्यू नव्हे, तर गळा दाबून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 14:03 IST

वसमत तालुक्यतील घटनेचा झाला उलगडा 

ठळक मुद्दे१२ मे रोजी नांदेड येथील १७ वर्षीय विद्यार्थिनी रेल्वेतून पडून मृत्यू शवविच्छेदन अहवालात मुलीचा गळा दाबून खून झाल्याचे निष्पन्न

वसमत (जि. हिंगोली) : तालुक्यातील पिंपळा चौरे शिवारात १२ मे रोजी नांदेड येथील १७ वर्षीय विद्यार्थिनी रेल्वेतून पडून मयत झाल्याची घटना घडली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात मुलीचा गळा दाबून खून झाल्याचे निष्पन्न झाले. गळा आवळून रेल्वेतून ढकलून खून केल्याप्रकरणी वसमत ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

वसमत तालुक्यातील पिंपळा चौरे रेल्वे रुळावर श्रावणी मारोती कदम (१७, विनायक नगर नांदेड) या विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला होता. तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली होती. मयताच्या शवविच्छेदन अहवाल पोलिसास प्राप्त झाला. यात मयताचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे नमूद आहे. मयत मुलीचा गळा दाबून खून केल्यावर तिला रेल्वेतून ढकलून दिले असल्याचे समोर आले आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारावरून वसमत ग्रामीण पोलिसांनी सदर प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी सपोउपनी दिगंबर कांबळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अपघाताचा बनावशवविच्छेदन अहवालावरून या खुनाला वाचा फुटली आहे. आता हा खून कोण्या कारणावरून झाला व आरोपी कोण आहेत हे पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे. सदर विद्यार्थिनीला कोणाचा त्रास होता का, कोणी टारगट त्रास देत होते का? अशा प्रकरणातून हा खून झाला की कसे, हे तपासात निष्पन्न होईल.

टॅग्स :Murderखूनrailwayरेल्वेHingoliहिंगोलीNandedनांदेड