शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

गौरी- गणपतीने यंदाही सोबत आणले वरुणराजाला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 00:53 IST

तालुक्यातील काही भागात महिन्याभरापासून दांडी मारलेल्या पावसाने ऐन गौरी- गणपतीच्या सणासुदीत पुनरागमन केले असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र उन्हामध्ये होरपळलेल्या पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : तालुक्यातील काही भागात महिन्याभरापासून दांडी मारलेल्या पावसाने ऐन गौरी- गणपतीच्या सणासुदीत पुनरागमन केले असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र उन्हामध्ये होरपळलेल्या पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.तालुक्यात महिन्याभरापासून पावसाने चांगलीच दांडी मारली. पोळ्याला पाऊस पडतो मात्र यंदा पोळ्यातही पावसाने हुलकावणी दिली. दिवसेंदिवस पडणाºया कडक उन्हामुळे ऐन शेंगा भरणीमध्ये आलेले सोयाबीनचे पीक धोक्यात आले होते. यामध्ये माळरानावरील पिके अर्ध्यावरच जळून गेली आहेत. या अगोदर अधिक पावसामुळे कापसाची पिके उन्मळून गेली होती. त्यातच सोयाबीनही करपून गेले. सध्या शिल्लक राहिलेले सोयाबीन पाणी नसल्याने शेवटची घटिका मोजत असतानाच ऐन महालक्ष्मीच्या सणात तालुक्यातील काही गावांत पावसाने शनिवारपासूनच हजेरी लावली. रविवारीदेखील सकाळी ११ ते दुपारी १.३0 च्या सुमारास विविध भागात पाऊस पडल्याने शेतकºयांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे. एक महिन्यांपासून पाऊस नसल्यामुळे अनेक ठिकाणच्या खडकाळ जमिनीवरील सोयाबीन होरपळून गेले. तर काही ठिकाणी शेंगाच भरल्या नव्हत्या.या पावसामुळे सोयाबीन पिकाला जीवदान मिळाले आहे. पाऊस नसल्यामुळे शेतकरी ठिबक व तुषारच्या मदतीने कापूस व हळद ही ीपके वाचविण्याच्या प्रयत्नामध्ये होती. मात्र या दमदार पावसामुळे चांगलाच दिलासा मिळाल्यामुळे शेतकरीवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. मात्र अर्ध्या तालुक्यावर पावसाची अवकृपा कायम असून हे शेतकरी देवाला प्रार्थना करीत आहेत.जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजारसह परिसरामध्ये सोमवारी दुपारी १२.३० ते १.३० वाजण्याच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. एक महिन्याच्या खंडानंतर पाऊस झाल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जवळा बाजारसह परिसरामध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. असोला, कोंडशी, जवळा बाजार, पुरजळ, बाराशिव, करंजाळा आदी परिसरामध्ये हजेरी लावली. या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, हळद या पिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. तब्बल महिनाभराच्या खंडानंतर हा पाऊस झाला.

टॅग्स :RainपाऊसGanesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८