शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गॅस संपला, तेल संपले: स्वयंपाक करु कशावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:56 IST

हिंगोली: पेट्रोल व डिझेलबरोबरच आता गॅस सिलिंडरच्या दरातही २५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला असून ...

हिंगोली: पेट्रोल व डिझेलबरोबरच आता गॅस सिलिंडरच्या दरातही २५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला असून ‘गॅस संपले तेल संपले, स्वयंपाक करु कशावर?’ असे म्हणण्याची वेळ महिलावर्गावर येवून ठेपली आहे.

सुदैवाची बाब म्हणजे गत दोन दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. खाद्यतेलाचे भावही वाढले आहेत. डिसेंबर महिन्यात गॅस सिलिंडर ६७०, जानेवारी महिन्यात ७२० भाव होते. ५ फेब्रुवारी रोजी ७४५, १५ फेब्रुवारी रोजी ७९५ आणि २५ फेब्रुवारी रोजी ८२० रुपये गॅस सिलिंडरचा दर झाला आहे. शहरातील बाजारपेठेत मागील काही दिवसांपासून तेलातही चढउतार सुरुच आहे. गत आठवड्यात सोयाबीन १३५, शेंगदाणा तेल १५५ प्रमाणे विकत घ्यावे लागत आहे. महागाईने कळस गाठला असून भाजीपाल्यासोबत किराणा बाजारातील वस्तूही महागल्या आहेत.

केंद्र सरकार सबसिडी सतत कमी असल्याने गॅस सिलिंडर महाग होत आहे. लोकांना घेणे आता परवडेना झाले नाहे. ग्रामीण भागात तर चक्कपणे चुलीवरच स्वयंपाक करणे अनेक गृहिणींनी पसंत केले आहे.

गॅस सिलिंडरचे दर कमी करण्याची महिलांची एकमुखी मागणी

महागाईने कळस गाठला असून, किराणा तसेच भाजीपाल्याचे भावही आता वाढू लागले आहेत. सरकार काय साध्य करु पाहत आहे, हेच कळायला मार्ग नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन दिवसांपासून स्थिर असले तरी खाद्य तेल कमी होण्याचे नाव घेत नाही. महागाईमुळे भाज्यांना फोडणीही कमी तेलातच द्यावी लागत आहे. तेव्हा प्र. के. अत्रे यांच्या ‘अति तिथे माती’ या नाटकातील संवादाप्रमाणे सर्वानी गाण्यांतून बोलावे, असे म्हणण्याची वेळ महिला वर्गावर आली आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया सुरेखा कल्याणनगर (यशवंतनगर), मनीषा देशमुख (सावरकरनगर), चतुराताई जगताप (लाला लजपतरायनगर), अर्चना मुळे (महावीरनगर), पूजा इंगोले (रामाकृष्णा सिटी), पुष्पा कावरे (श्रीनगर), विद्या लाखकर, शीतल दन्नर, वंदना अग्रवाल (कापड गल्ली) आदी महिलांनी दिली.