शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडहून ऑटोतून आणलेला गांजा स्थानिक गुन्हे शाखेने केला जप्त 

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: November 10, 2023 16:42 IST

अडीच लाखांच्या गांजासह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली : नांदेड येथून एका ऑटोतून आलेला अडीच लाख रूपये किमतीचा १० किलो ६२ ग्रम गांजा स्थानिक गु्न्हे शाखेच्या पथकाने पकडला. ही कारवाई १० नोव्हेंबर रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

नांदेड येथून एका ऑटोतून गांजा आणला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, उपनिरीक्षक विक्रम विठुबोने यांच्या पथकाने शुक्रवारी पहाटे नांदेड नाका येथे सापळा लावला. या वेळी एमएच २६ बीडी ४५३५ क्रमांकाचा ऑटो येत असल्याचे पथकाला दिसले. पथकाने ऑटो चालकास वाहन थांबविण्यास सांगितले. वाहन थांबवून नाव गाव विचारले असता त्याने शेख युनूस शेख सलीम (रा. इतवारा नांदेड) असे सांगितले.

ऑटोची तपासणी केली असता ऑटोत अडीच लाख रूपये किमतीचा १० किलो ६२ ग्रम गांजा आढळून आला. हा गांजा नांदेड येथील एकाच्या सांगण्यावरून विक्रीस आणला असल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांनी गांजा व ऑटो असा एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोन यांच्या फिर्यादीवरून शेख युनूस शेख सलीम व अन्य एकाविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.   ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार सुनील अंभोरे, नितीन गोरे, किशोर सावंत, शंकर ठोंबरे, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले यांच्या पथकाने केली.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी