गांधी चौकात विद्युत रोहित्राने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:57 AM2021-03-04T04:57:12+5:302021-03-04T04:57:12+5:30

हिंगोली: शहरातील गांधी चौक येथे दुपारच्यावेळेला विद्युत रोहित्राला आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशामक प्रमुखाने तत्परता दाखवत बंबाद्वारे आग आटोक्यात ...

In Gandhi Chowk, Vidyut Rohitra took the stomach | गांधी चौकात विद्युत रोहित्राने घेतला पेट

गांधी चौकात विद्युत रोहित्राने घेतला पेट

Next

हिंगोली: शहरातील गांधी चौक येथे दुपारच्यावेळेला विद्युत रोहित्राला आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशामक प्रमुखाने तत्परता दाखवत बंबाद्वारे आग आटोक्यात आणली. यामुळे पुढील अनर्थ टळला.

१ मार्चपासून शहरात टाळेबंदी जाहीर केली आहे. त्यामुळे या भागात दुकाने उघडी नाहीत. एरव्ही हा भाग वर्दळीचा असतो. ३ मार्च रोजी अग्निशामक प्रमुख बाळू बांगर हे कामानिमित्त गांधी चौक येथे आले होेते. विद्युत रोहित्राला आग लागल्याचे यावेळी त्यांच्या लक्षात आले. त्यांनी क्षणाचा विलंब न करता महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना गांधी चौकातील वीज रोहित्राला आग लागल्याची सूचना केली आणि लाईनमन लवकर पाठविण्याची विनंतीही केली.

याचबरोबर अग्निशमन विभागालाही गाडी घेऊन येण्याचे आदेशित केले. दोन्ही विभागांतील कर्मचारी तातडीने गांधी चौक येथे हजर झाले. तोपर्यंत पावणेतीन वाजले होते. तत्परता दाखवत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी गांधी चौक परिसरातील वीजपुरवठा तातडीने खंडित केला. दुसरीकडे अग्निशामन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत रोहित्रावरील आग तातडीने विझविली.

गांधी चौक येथील विद्युत रोहित्राला लागलेली आग तातडीने विझविली गेल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

फोटो

Web Title: In Gandhi Chowk, Vidyut Rohitra took the stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.