शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

इंधनासाठी २१ गावांना निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:18 IST

पाणी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत ११० गावांना सहभाग नोंदविला. जलसंधारणाच्या कामाकरीता इंधनासाठी २१ गावांना प्रत्येकी ७५ हजारांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : पाणी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत ११० गावांना सहभाग नोंदविला. जलसंधारणाच्या कामाकरीता इंधनासाठी २१ गावांना प्रत्येकी ७५ हजारांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे.वॉटरकप स्पर्धा २२ मेपर्यंत राहणार आहे. जलसंधारणाची कामे जेसीबी मशीनद्वारे होत आहे. मशिनीला लागणाºया इंधनासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. तालुक्यातील कवडा बिबथर, सिंदगी, कांडली, बाभळी, शेनोडी, भुरक्याची वाडी, खापरखेडा, चिंचोर्डी, वारंगा तर्फे नांदापूर, निमटोक, रेणापूर, हिवरा, येडशी, येडशी तांडा, पार्डी, कळमकोंडा, असोलवाडी, गोर्लेगाव, बोल्डावाडी, रुपूर या २१ गावाना प्रत्येकी ७५ हजार प्रमाणे १५ लाख ७५ हजाराचा निधी मंजूर झाला आहे. स्पर्धेतील गावांचा उत्साह टिकावा व जास्तीत जास्त गावे जलपरिपूर्ण व्हावीत, यासाठी स्पर्धेत सहभागी गावांना इंधनासाठी दीड लाख रुपये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत देण्यात येत आहेत.लोकसहभागातून झालेल्या व मशिनद्वारे झालेल्या कामांचा लेखाजोखा ग्रामपंचायतने ठेवावा, मिळालेल्या निधीची माहिती ग्रामसभेत द्यावी लागणार आहे. धनादेशाद्वारेही रक्कम ग्रामपंचायतींना द्यावी लागणार आहे. इंधनासाठीच्या कामाचा प्रस्ताव ग्रामपंचायतमार्फत तहसील कार्यालयास प्राप्त होताच १०० टक्के निधी वितरीत करण्यात येणार आहे. कामाच्या मोजमापाचा अहवालही तांत्रिक अधिकाºयांमार्फत प्रशासनाला द्यावा लागणार आहे. यापुर्वी रामवाडी, मसोड, जरोडा या तीन गावांना प्रत्येकी ७५ हजाराचा निधी इंधनासाठी देण्यात आला आहे. सध्या कळमनुरी तालुक्यातील वॉटर कप स्पर्धेतील गावांमध्ये लोकसहभागातून कामे जोमात सुरू आहेत. अनेक ठिकाणी लग्नसराईचा परिणाम होत असून काही ठिकाणी यावर मात करून ग्रामस्थ लढा देत असल्याचे चित्र आहे. या स्पर्धेत बक्षीस मिळविण्यासाठी एकजूट दाखवत काही गावांनी वाखाणण्याजोगे काम केले आहे. अशा गावांचा या कामांमुळेच फायदा होणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणी