शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच पाण्याचे मडके फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औंढा नागनाथ : शहरात सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळाला चार दिवसांआड दहा मिनिटेच पाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : शहरात सद्यस्थितीत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नळाला चार दिवसांआड दहा मिनिटेच पाणी येत असल्याने संतप्त आंदोलक महिलांनी नगरपंचायतीत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोरच मडके फोडून संताप व्यक्त केला.नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. याकडे मात्र नगरपंचायत दुर्लक्ष करीत असल्याची ओरड सुरु आहे. सोमवारी प्रभाग क्रमांक १५ महिलांनी नगरपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला होता. तर यावेळी महिला एवढ्या संतप्त झाल्या होत्या की, महिलांनी अक्षरश: मुख्याधिकाºयांच्या कक्षासमोरच रिकामे पाण्याचे मडके फोडले. त्यानंतर निवेदन दिले. यापुढे जर सुरळीतपणे पाणी नळाला नाही सोडले तर आंदोलन अधिक तीव्र करून घागर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा महिलांनी नगरपंचायतला दिला आहे.प्रभाग क्रमांक ७ व १५ या प्रभागात नळाला सुरळीत पाणी येत नाही. त्यामुळे मोर्चात महिला हंडे घेऊन हजर झाल्या.या निवेदनावर नगरसेवक सुमेध मुळे, लक्ष्मी काळे, पार्वती देशमुख, छाया तोंडे, निर्मला राऊत, राजाबाई पालक, सुनिता गोरे, शेख अजनबी, चंद्रकला राऊत, प्रल्हाद काळे, भगवान देशमुख, ज्ञानेश्वर पाटील, पवन राऊत, प्रल्हाद पालक आदींच्या स्वाक्षºया आहेत. लवकरात पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. नळाला सात दिवसांत केवळ दहा मिनिटेच पाणी येते. त्यामुळे पाणी दोन दिवसही पुरत नसल्याने ग्रामस्थांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.पाणीपुरवठा सुरळीत करू - चौंढेकरशहराला सध्या दोन दिवस आड पाणी देण्यात येत आहे, परंतु विद्युतपंप जळाल्याने पाणी टाकीमध्ये आले नाही. त्यामुळे प्रभागात पाणी जायला उशीर झाला आहे. यानंतर औंढा तलावातून नवीन पूरक पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापुढे पाणीपुरवठा सुरळीत होईल. असे नगराध्यक्षा सविता चौंढेकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतwater scarcityपाणी टंचाई