शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

वाळूघाट लिलावांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:21 IST

न्यायालय आदेशामुळे थांबलेली वाळूघाट लिलावाची प्रक्रिया ही स्थगिती उठल्यामुळे पुन्हा सुरू झाली आहे. राखीव ठेवायचे घाट निश्चित केल्यानंतर उर्वरित घाटांचे लिलाव काढण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : न्यायालय आदेशामुळे थांबलेली वाळूघाट लिलावाची प्रक्रिया ही स्थगिती उठल्यामुळे पुन्हा सुरू झाली आहे. राखीव ठेवायचे घाट निश्चित केल्यानंतर उर्वरित घाटांचे लिलाव काढण्यात येणार आहेत.हिंगोली जिल्ह्यातील २६ वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र मध्येच न्यायालयाने स्थगिती दिल्याचे पत्र धडकले अन् ही प्रक्रिया थंड बस्त्यात गेली. त्यानंतर जिल्ह्यात विविध भागातील वाळू घाटांवरून अवैध उपशाने जोर पकडला आहे. अजूनही हा प्रकार थांबला नसून मध्यंतरी काही भागात पथकांनी कारवाई केली. तर काही भागात नुसतेच कारवाईचे नाटक सुरू आहे.दरम्यान, आता न्यायालयाने स्थगिती उठविल्याने वाळू घाट लिलावाची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. यापूर्वी निश्चित केल्याप्रमाणे हिंगोली तालुक्यातील खेर्डा, दुर्गधमाणी, हिंगणी, सेनगाव तालुक्यातील सालेगाव, कळमनुरी तालुक्यातील शेवाळा, कोंढूर, डोंगरगाव पूल, चिखली, चाफनाथ, कान्हेगाव, डिग्रस त.को., सावंगी भू, सापळी, पिंप्री बु., औंढा तालुक्यातील आजरसोंडा, नालेगाव, पूर, अंजनवाडी, भगवा, चिमेगाव, पोटा खु., पोटा बु., अनखळी, तपोवन, दरेगाव, माथा या घाटांची लिलावप्रक्रिया होणार होती. मात्र यापैकी काही घाट शासकीय कामांसाठी राखीव करण्यात येणार आहेत. यासाठी बांधकामाशी संबंधित विविध विभागांना पत्र दिले आहे. या विभागांनी मागणी केलेले घाट वगळता इतर घाटांतील वाळूच्या लिलावाची प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे राखीव घाटांची प्रतीक्षा लागली आहे.सध्या महसूल विभागासमोर वाळूचा अवैध उपसा रोखण्याचे मोठे आव्हान आहे. हा उपसा रोखला तरच हे घाट लिलावात जाणार आहेत. अन्यथा या घाटात वाळूच शिल्लक राहिली नाही तर वाळू घाट घेणार कोण? हा प्रश्न आहे. काही ठिकाणी तर अधिकाऱ्यांची मूकसंमतीच या घाटांना रिते करण्यास कारणीभूत ठरू लागली आहे. मध्यंतरी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तंबी दिल्याने काही दिवस कारवाईचे नाटक चालले. आता पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती झाली आहे. त्यामुळे प्रश्न गंभीर बनत चालला आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.विविध विभागांना शासकीय कामांसाठी लागणाºया वाळूसाठी किती घाट राखीव होतात, यावरून २६ पैकी किती घाटांचा लिलाव होईल, हे निश्चित होणार आहे.महसुलाला वसमतमध्ये लागला सुरुंगवसमत : वसमत तालुक्यात वाळूमाफिया व पुरवठादारांच्या लॉबीने अवैध उपशाचा सपाटा लावला आहे. तालुक्यात वाहतूक होणाºया वाहनांची संख्या पाहता रेती घाटांचे लिलाव होण्याच्या तारखेपर्यंत घाटातील रेती लंपास होण्याची भिती आहे. महसूल उत्पन्नाला लागलेल्या सुरूंगाला थोपवण्या अवघड आव्हान महसूल यंत्रणेसमोर आहे.महसूल यंत्रणा नदी घाटातून उपसा होत नाही याची खबरदारी घेत असले तरी तालुक्यातील रिचार्ज झालेले रेती माफीया व बहाद्दर पुरवठादार महसूल यंत्रणेवर वरचढ चढत असल्याचेच चित्र आहे. वसमतमध्ये रात्री अपरात्री रेती घेवून येणारी वाहने व ओली व दर्जेदार रेती पाहता ताजे उत्खनन करूनच ही रेती येत आहे. हे स्पष्ट दिसत आहे. ढवूळगाव-माटेगाव परिसरात ठरावीक ट्रॅक्टरमार्फत नदीतून रेती जमा करून ती ठरावीक वाहतूकदारांच्या माध्यमातून पुरवठा होत आहे. रेतीअभावी बांधकाम बंद असल्याच्या तक्रारी इतर तालुक्यातून येत असल्या तरी वसमत तालुक्यात रेती अभावी बांधकाम बंद असल्याचे चित्र नाही. रेती घाटातून चोरी करून रेती लंपास होते, असा युक्तीवाद होत असला तरी एखादे ट्रॅक्टर चोरीचे येवू शकते. १५ ते २० टिप्पर किंवा ट्रक जेव्हा एकाच मार्गावर वाहतूक करत असतील तर या प्रकारास चोरी ही संज्ञा देणेही जिकरीचे ठरणारे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जर रेतीचा उपसा होत असला तर तालुक्याती रेती घाटाचे लिलाव होईपर्यंत घाटात किती रेती शिल्लक राहील, हा प्रश्नच आहे.

टॅग्स :Hingoli collector officeजिल्हाधिकारी कार्यालय हिंगोलीCourtन्यायालय