शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यातील चौदा जणांना केले तडीपार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 23:39 IST

कायदा व सुरक्षितता तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि जगदीश भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतील एकूण १४ जणांच्या तडीपारीचे आदेश काढण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कायदा व सुरक्षितता तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि जगदीश भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतील एकूण १४ जणांच्या तडीपारीचे आदेश काढण्यात आले आहेत.यामध्ये पप्पू उर्फ आसराजी सुरेश चव्हाण (रा. प्रवीणनगर हिंगोली), प्रवीण दिगंबर जाधव (रा.अकोला बायपास हिंगोली) यांना हिंगोली तालुक्यातून एक वर्षाकरिता तर संदेश बालासाहेब देशमुख (रा.सेनगाव) यांना उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी हिंगोली, सेनगाव तालुक्यातून एका वर्षाकरीता तर शेख जावेद शेख इस्माइल कुरेशी (रा. दर्गा मोहल्ला कुरूंदा), सय्यद गौस सय्यद मुनीर, शेख रफीक शेख बशीर (रा. कुरूंदा) यांना उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी एक वर्षाकरिता तसेच शेख खलील उर्फ फावडा शेख शब्बीर (रा. काजी मोहल्ला, कळमनुरी), शेख आसेफ शेख खलील (रा. इंदिरा नगर कळमनुरी), विजय शंकर कोकरे (रा. भोसी ता.कळमनुरी), शेख जमील शेख खलील, शेख अखील शेख खलील (रा. इंदिरा नगर, कळमनुरी), संतोष भिकू राठोड रा. भाटेगाव ता.कळमनुरी यांना कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी हिंगोली जिल्ह्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आल्याचे आदेश जारी केले आहेत. यापुढेही हिंगोली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आतापर्यंत पाठवलेल्या प्रस्तावापैकी राहिलेले ४० ते ५० इसमाविरूद्ध हिंगोली, वसमत व कळमनुरीच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून सदर प्रस्तावावर लवकरच आदेश निर्गमित होणार आहेत.पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोनि जगदीश भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याकडून आतापर्यंत म.पो.का. कलम ५६ प्रमाणे एकूण ७९ प्रस्ताव मपोका कलम ५७ प्रमाणे ९ प्रस्ताव तसेच कलम ५५ मपोका प्रमाणे एकूण ४ प्रस्ताव मागविले होते. सदर प्रस्ताव उपविभागीय अधिकारी हिंगोली, वसमत व कळमनुरी यांच्याकडे हद्दपारीच्या शिफारशीसह प्रस्ताव पाठवले असता कळमनुरी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून ४ इसमांना तडीपार केले असून नवीन आदेशाने १४ इसमांना हद्दपार केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस