शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात पूर्णा शहरवासीयांची पाण्याची चिंता मिटली; सिद्धेश्वर धरणातून मोठा विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 19:06 IST

पूर्णा शहरासाठी नदीपात्रात सोडला विसर्ग;सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडले

- हबीब शेखऔंढा नागनाथ ( हिंगोली) : परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत पूर्णा शहराच्या मुख्याधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केलेल्या मागणीच्या अनुषंगाने सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असून त्याद्वारे पूर्णा शहरासाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सिद्धेश्वर धरणातून २० नोव्हेंबर २०२४ पासून नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील शेतीच्या सिंचनासाठी निरंतर कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. आता १ मार्चपासून उन्हाळी हंगामाचे पहिले आवर्तन देण्यात येत आहे. त्यातच सिद्धेश्वर जलाशयावर अवलंबून असलेल्या परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्णा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी केल्याने ४ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेदरम्यान सिद्धेश्वर धरणाचे चार दरवाजे १ फूट उचलून २ हजार ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पूर्णा शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा शहरालगतचा कोल्हापुरी बंधारा भरेपर्यंत पुढील तीन ते चार दिवस पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे पूरप्रवण क्षेत्र तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

‘सिद्धेश्वर’ मध्ये ३६ टक्के जिवंत साठा...तालुक्यातील सिद्धेश्वर धरणातून हिंगोलीसह परभणी व नांदेड या तीन जिल्ह्यांतील ५७ हजार हेक्टर शेतीचे सिंचन केले जात आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत रब्बी हंगामाच्या तीन पाणी पाळ्या देण्यात आल्या असून १ मार्चपासून उन्हाळी हंगामाच्या पहिल्या आवर्तनास सुरुवात करण्यात आली. प्रत्येक अवर्तनाला कमीतकमी ६० दलघमी पाण्याची आवश्यकता असते. परंतु सिद्धेश्वर जलाशयात आजमितीस केवळ ३० दलघमी (३७ टक्के) जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच पूर्णा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात आले असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे.

येलदरी धरणातून पाण्याची आवक...लाभक्षेत्रातील शेतीच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे सिद्धेश्वर धरणाची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे. पुढील पाणीपाळीस अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पाणीपातळी स्थिर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून येलदरी धरणाचे दोन विद्युत निर्मिती टर्बाइन चालू करण्यात आले असून त्याद्वारे सिद्धेश्वर जलाशयाचा पाणी साठा स्थिर ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीDamधरणAgriculture Sectorशेती क्षेत्र